Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नाशिक न्यायालयातील प्रकरण , धुळे, न्यायालयात वर्ग करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश :

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद :  प्रकरण माननीय न्यायालय, नाशिक, हून न्यायालय धुळे, येथे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश :  
धूळे - अर्जदार वर्षा नवले, राहणार धुळे, हिने पती प्रशांत नवले, राहणार नासिक, यांच्याविरुद्ध  मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, येथे पतीने  न्यायालय, नासिक, येथे दाखल केलेले प्रकरण  न्यायालय, धुळे, येथे वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. थोडक्यात माहिती अशी कि, विवाह नंतर दोन्ही पक्षकारांमध्ये शुल्लक कारणांवरून मतभेद वाढत गेले. दोन्ही पक्षकारांनी एक दुसऱ्यांच्या विरुद्ध  न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.  
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती श्री. एस. सी. मोरे) यांनी दिनांक ११.०८.२०२३ रोजीच्या आदेशान्वये पतीने न्यायालय, नासिक, येथे दाखल केलेले  प्रकरण  न्यायालय, धुळे, येथे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत. पत्नीतर्फे एडवोकेट महेश एस. सोनवणे व एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.