शहादा दि२८ (प्रतिनिधी) 26 में रोजी बुद्ध विहार परिसर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे, अ.भा. पा.बा समाज मंडल संचलित “आदिवासी बोलीभाषा संवर्धन एंव साहित्य परिषद” गठित करण्यात आले. आदिवासी बोली भाषा आणि साहित्याचे अस्तित्व लक्षात घेता आज बोली भाषा व आदिवासी साहित्य निर्मितीची नितांत गरज आहे. या परिषदचे उद्देश्य म्हणजे जास्तीत जास्त आदिवासी मौखिक साहित्याचे संकलन करणे, आदिवासी कवि साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करणे. आदिवासी साहित्याचे विकृतीकरण थांबवून त्या साहित्यात आदिवासियत मांडणे. नवोदित साहित्यिकां संमेलने चर्चासत्र घेणे इत्यादि अनेक महत्वपूर्ण उद्देश्य लक्षात घेऊन ही परिषद गठित करण्यात आले आहे.
आदिवासी बोली भाषा संवर्धन एंव साहित्य निर्माण परिषदेच्या ठरावात अध्यक्ष म्हणून सर्वानुमते मा. बबन निकुम यांची नियुक्ती करण्यात आले आहे तर (उपाध्यक्ष) दशरथ पावरा, भीमराज पावरा( उपाध्यक्ष) कवि संतोष पावरा (सचिव) लक्ष्मण पावरा सहसचिव तर सदस्य म्हणून डॉ. मोहन पावरा, डॉ. विजयसिंह पावरा, डॉ डी. एल. पावरा, डॉ. भगतसिंग पटले, चंपालाल निकुम, वनिता ताई पटले, प्रेम भंडारी, कैलास चौहान, मनोज पावरा, अशा तर्हेने कमिटी गठित करण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी बोली भाषा संवर्धन एंव साहित्य निर्माण परिषद च्या वतीने भीमराज पावरा यांचे, “ आदिवासी समजोन जिवणो” कपिल निकुंब यांचे आदि मूळ धर्म ( संत गुलाम महाराज चरित्र) प्रेम भंडारी यांचे तीर कमान, कैलास चौहान यांचे चालता चालू तर संतोष पावरा यांचे हेमटू (अतिक्रमण) पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ साहित्यकार विचारवंत वाहरू सोनवणे तर अध्यक्षस्थानी नामदेव जी पटले, सुरेश मोरे साहेब, सुशीलकुमार पावरा ईश्वर साळुंके, राजु डूडवे , रामसिंह डूडवे मनिषा पावरा, राजेश पावरा, शिवाजी पावरा, कैलास बारेला , चुन्नीलाल ब्राम्हने आदि साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.