शहादा, ता. 22: डोंगरगाव, ता. शहादा येथील मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या फेब्रुवारी-मार्च 24 झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्यालयातील यशवी विवेक पटेल हिने 91.67 टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल असा, यशवी विवेक पाटील (91.67 %) प्रथम, मोहित मंगेश पाटील (86.50 %) द्वितीय तर प्रसिद्धी राजेश जैन आणि प्रियंका घनशाम पाटील (86.00 %) गुण मिळवीत तृतीय आले आहेत. विद्यालयातील 68 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह, 33 विद्यार्थी प्रथा श्रेणीत तर 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत अशोक पाटील, सचिव सौ. मुक्ता पाटील, शैक्षणिक समन्वयक प्रा. डी. सी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला पाटील, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हर्षदा पाटील व प्राध्यापक वृंदाने अभिनंदन केले आहे.