Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील


तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील

नंदुरबार दि १३ (प्रतिनिधी)येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी एक दिवसीय शिक्षक प्रेरणा कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत एकूण चार हजार शिक्षकांनी सहभाग नोंदविला. 
                 कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा नॅनो तंत्रज्ञानाचे संशोधक डॉ.एल.ए.पाटील उपस्थित होते. 
संपूर्ण दिवसभरात तीन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रत्येकी 1300 शिक्षक याप्रमाणे एकूण 3900 शिक्षक तसेच 100 पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 
           कार्यशाळेच्या प्रथम सत्रात शहादा व तळोदा, द्वितीय सत्रात नवापूर व धडगांव तर तृतीय सत्रात नंदुरबार व अक्कलकुवा येथील शिक्षकांना सहभागी करुन घेण्यात आले होते.

तीनही सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ.एल.ए.पाटील यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व तत्वज्ञान या विषयांची जोड देऊन सर्व शिक्षकांना तळगाळातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी देखील मागील शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय बाबींचे कौतुक करुन नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांना वर्षभरातील राबवावयाचे उपक्रम व कार्यक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
               यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, रमेश चौरे, डॉ. योगेश सावळे, शेखर धनगर, प्रशांत नरवडे, धनराज राजपूत यांनी त्यांच्या तालुक्यातील उपक्रमांचे सादरीकरण केले.
शिक्षक प्रेरणा कार्यशाळेच्या प्रत्येक सत्राचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले. प्रत्येक सत्राचे सुत्रसंचालन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी केले तर आभार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी मानले.
कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता बाबासाहेब बडे, डॉ. भारती बेलन व विनोद लवांडे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, विषय शिक्षक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. 
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, समग्र शिक्षाचे मयुर वाणी, योगेश रघुवंशी, मनीषा पवार यांनी परिश्रम घेतले.