नंदुरबार दि १५ (प्रतिनिधी) दि.05/06/2024 रोजीचे सायंकाळी ते दि.06/06/2024 रोजी सकाळी 07/15 वा. सु. नंदुरबार शहरातील विमल प्लाझा कॉम्प्लेक्स मधील गुरूकृपा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी 5.64,300/-रु. किंमतीचे चांदीचे दागिने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले म्हणुन श्री. संजय हिरालाल सोनी वय- 43 धंदा व्यापार रा. महाविर कॉलनी बंगला क्र. 16 नंदुरबार यांचे तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 216/2024 भा.दं. वि. कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 14/06/2024 रोजी पो.नि.श्री. किरणकुमार खेडकर सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा नंदुरबार शहरातील बंटी, रा.CB पेट्रोल पंपाच्या मागे याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असून ते सद्या एकता CB पेट्रोल पंप परिसरात फिरत आहेत. सदर मिळालेल्या बातमीवरुन पो.नि.श्री. किरणकुमार खेडकर, सपोनि-श्री. दिनेश भदाणे, पोउनि-श्री. मुकेश पवार, पोना/974 विशाल नागरे, पोना/1147 मोहन ढमढेरे, पोशि/699 अभय राजपुत, पोशि/1278 आनंदा मराठे असे संशयित इसमांचा शोध घेणेकामी रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने CB पेट्रोल पंप परिसरात जावून संशयित इसम बंटी याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले. त्यास त्याच्या पालकांसमक्ष उपरोक्त घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदार नामे दिपक ऊर्फ भुत्या भिका पाडवी, वय 19 वर्षे रा. वाघोदा ता.जि. नंदुरबार याचे मदतीने महिलांचे कपडे परिधान करुन रात्रीच्यावेळी दागिने चोरी केलेबाबत सविस्तर माहिती दिली.ताब्यात घेण्यात आलेला विधी संघर्षग्रस्त बालक व दिपक ऊर्फ भुत्या यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा नंदुरबार शहरातील नदीम ऊर्फ गोल्डन यास विक्री केल्याचे सांगितले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने शहरातील कुरैशी मोहल्ला परीसरात सदर व्यक्तीचा शोध घेतला असता सदर नदीम शेख ऊर्फ गोल्डन रहीम मेहतर वय-33 रा. बिस्मोल्ला चौक, कुरैशी मोहल्ला, नंदुरबार हा मिळून आला. सदर इसमांना उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील अधिक तपास पोउनि अनिल गोसावी, उपनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. मुकेश पवार, तसेच पोना/974 विशाल नागरे, पोना/1147 मोहन ढमढेरे, पोशि/699 अभय राजपुत, पोशि/1278 आनंदा मराठे यांनी केली आहे.