Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्फाबेट स्कूल मोलगी येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरा

 अल्फाबेट स्कूल मोलगी येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरा
     मोलगी दि २६ (प्रतिनिधी) अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे लोकराजा म्हणून ओळख असणारे छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ईश्वर वसावे हे होते उपस्थित होते.  
              कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या शिक्षिका मनीषा वसावे यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या संघर्षमय जीवन चरित्रावर आधारित विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वसावे यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रतिपादीत केले व जीवनातील विविध प्रसंग सांगितले. त्यानंतर शाळेतील मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. 
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सहशिक्षिका लीला पाडवी, मनीषा वसावे, सरिता पाडवी, मथुरा वसावे व हीराबाई वळवी यांनी मेहनत घेतली. यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.