उद्या पालकांना एसएमएस येणार 23 पासून प्रवेश प्रक्रिया
नंदुरबार दि २२(प्रतिनिधी) उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशाबाबत निर्णय दिल्यांनतर विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 साटी शिक्षण हक्क अधिनियम अर्थात आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी आज दिनांक 20. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सोडतीनुसार नंदुरबार जिल्यासाठी 54 शाळांमध्ये 298 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग घटाकांकरीता खासगी विनाअनुदनित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत 25 टक्के आरक्षित कोटयातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार नंदुरबार जिल्हयातील 54 पात्र शाळांमधील आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 419 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहीत याचिका व रिट यचिकेवर दि.19 जुलै, 2024 रोजी अंतिम निर्णय दिला हे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक 7 जून, 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड व प्रतिक्षा यादी शनिवारी, दिनांक 20 जुलै, 2024 रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हयातील एकुण 54 पात्र शाळांमध्ये एकुण 880 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 298 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
*पालकांना येणार संदेश*
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सेामवार दिनांक 22 जुलै, 2024 पासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरवात होईल.तसेच दिनांक 23 जुलै, 2024 पासून प्रवेश् प्रक्रीया सुरु होईल. पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबुन न राहता संबंधित सकेतस्थळावर अर्जची स्थीती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमां टाकुन त्याचा प्रवेश् निष्चित झालेला आहे की नाही याची पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना वळवी यांनी केली आहे.
Total School- 54
Vacancy-419
Applicaion Student-880
Select Student Round 1 - 298