Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

थोर साहित्यीक अण्णा भाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाति मोर्चा तर्फे प्रतिमा पुजन व फुल पुष्प हार अर्पण व अभिवादन

तळोदा दि १८ ( प्रतिनिधी )थोर साहित्यिक साहित्यरत्न,
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
      डॉ.अण्णाभाऊ साठे हे सिद्धहस्त कादंबरीकार,
लोकशाहीर म्हणून लोकप्रिय होते.शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजात अण्णाच्या शाहिरी आणि कवितांमधून समाजप्रबोधनाची बीजे पेरली गेली.त्यांनी आपल्या प्रतिभेतून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि वंचितांना आधार दिला.वास्तववादी लिखाण करून शोषितांच्या व पीडितांच्या व्यथा परखडपणे आपल्या झुंजार लेखणीतून व शाहिरीतून मांडल्या अशा महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.
      पुण्यतिथीनिमित्त
भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाति मोर्चा तर्फे प्रतिमा पुजन व फुल पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन 
अंबालाल भाऊ साठे (जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा.भा.ज.पा.संस्थापक अध्यक्ष/ महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउदेशीय संस्था तळोदा व जिल्हा उपाध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा भाजपा) श्रावण तिजवीज (जिल्हा कोषाध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा भाजपा) शैलेंद्र अहिरे, (जिल्हा सरचिटणीस अनुसुचित मोर्चा भाजपा) भगवान अहीरे, सोनु नरभवर, सामाजिक कार्यकर्ता सुभाष भाऊ अहीरे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र अहिरे, सामाजिक कार्यकर्ता ऋषी पाडवी, सामाजिक कार्यकर्ता,जिल्हा सोशल मिडीया प्रमुख अनुसुचित जाति मोर्चा भाजपा रोहीत अहीरे, महेंद्र छबु अहिरे व भाजपा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.