Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात वनपट्टे संदर्भात आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्य यांच्याशी चर्चा व निवेदन

तळोदा दि १९( प्रतिनिधी) जिल्ह्यातील 3000 हुन अधिक वनधारकांनी आपल्या समस्या आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात समूहाने आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्य यांचा समोर चर्चा करून व निवेदन दिले.
        आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या हे दि १८ रोजी नंदुरबार दौऱ्यावर आले असताना आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील 2005 पूर्वीची वन हक्क दावे ताब्यात असलेली जमीन, वन दावे दाखल केलेले असून अद्यापही सुनावणी न झालेले प्रलंबित व मंजुरी न मिळालेले सर्व वनधारकांना वनपट्ट्यांना मंजुरी मिळावी यासाठी आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. 
      प्रसंगी मेळाव्याला संबोधित करताना आमदार राजेश पाडवी म्हणाले , शहादा तळोदा मतदार संघातील चाळीसहुन अधिक वर्षापासून वनदावे प्रलंबित आहेत परिणामी वनदावे धारकांना शासनाच्या कुठल्याही योजना मिळत नाही, यामुळे वनधारकांमध्ये आदिवासी समाजात तीव्र नाराजीची भावना आहे आयोगाने या समस्या लक्षात घेऊन अतिशय तातडीने वनदावे मंजूर करून त्यांना सातबारा सुपूर्द करण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात जेणेकरून वर्षानुवर्ष ताब्यात असलेली जमीन त्यांच्या हक्काची होईल. 

         तसेच यावेळी जिल्ह्यातील आदिवासी समाज ज्या मूलभूत सुविधांपासून वंचित असून अनेक समस्याशी तोंड देतोय अगदी पायाभूत सुविधांपासून देखील अनेक गाव पाडे वंचित असून अशा पाड्यांचा विकास होण्यासाठी गांभीर्याने विचार करावा. 
       विशेषता नंदुरबार जिल्ह्याला एक जाज्वल्य व क्रांतिकारक इतिहास लाभला असून आदिवासी आयोगाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील जाज्वल्य क्रांतिकारक इतिहास घडवणाऱ्या आपकी जय परिवाराचे गुलाम महाराज, रामदास महाराज, व आदिवासी नेते यांनी ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक लढायांचे नेतृत्व करणार ते धाडसी व शूर नेते होते, तसेच रावलापाणी येथे 1943 मध्ये घडलेली भयानक घटना ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या असंख्य आदिवासी बांधवांवर ब्रिटिश राजवटीने बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केले अगदी जालियनवागवाला बाग हत्याकांड ची प्रतिकृती तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे घडली या निरपराध आदिवासींना ब्रिटिशांनी ठार केले बलिदान दिलेल्या आदिवासी बांधवांना देखील समाजातील महापुरुषांना आदिवासी वीरांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी केली . 
       यावेळी आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्य यांनी निवेदन स्वीकारले आहे व मेळाव्याला संबोधित करताना अध्यक्ष म्हणाले तातडीने समाजातील वनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे वनधारकांना विश्वास दिला.