Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे वृक्षदिंडी काढून जनजागृती व वृक्षारोपणाचा कृतीशील कार्यक्रम संपन्न

माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
  तळोदा दि २० (प्रतिनिधी) तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवार दि २० रोजी वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष सरपंच मीराताई रहासे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोरद बीटाचे केंद्रप्रमुख दशरथ वायकर,  सिताराम रहासे, संदीप खर्डे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक भरत वळवी, पोलीस पाटील रतिलाल डूमकुल, सामाजिक कार्यकर्ते सचिन रहासे व गावातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते.

            कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन राजेंद्र ढोढरे यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी वृक्षांचे महत्त्व आणि त्यांची जोपासना याविषयी उद्बोधन केले. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या विषयी माहिती दिली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गुरुपौर्णिमा देखील साजरी करण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर गावात दिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र ढोढरे, संदीप मोरे, विलास मगरे, तुकाराम भील, विलास पाडवी, सुदाम जांभोरे, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, मोहनसिंग वळवी,सुबोध जावरे, आदींनी परिश्रम घेतले आभार विलास मगरे यांनी मानले