Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आर्टस् कॉमर्स कॉलेज ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा सुधीरकुमार माळी व निखीलकुमार तुरखीया यांचे प्रमूख दाते या प्रवर्गातून सभासदत्व कायमस्वरूपी रद्द - अध्यक्ष भरत माळी

तळोदा दि २१ (ता प्र ) आर्टस् कॉमर्स आणि काॅलेज ट्रस्ट तळोदाचे अध्यक्ष भरतभाई माळी यांच्या नेतृत्वात सभासदांना मिळाला ख-या अर्थाने २७ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे . सन १९९७ नंतर तब्बल २७ वर्षानंतर प्रथमच साली सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
       अध्यापक शिक्षण मंडळद्वारा संचालित आर्टस् व फॉमर्स कॉलेज ट्रस्ट तुळोदे या संस्थेची सर्वसाधारण सभा ही संस्थेचे अध्यक्ष. भरत माळी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी ठिक - १० वाजता आर्टस् व कॉमर्स महाविद्यालयाच्या प्रमूख ईमारतीत घेण्यात आली. या सभेला कॉलेज ट्रस्टचे माजी अध्यक्ष चुनिलाल मुरार सुर्यवंशी यांच्यासह जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने हजर होते. सर्वप्रथम आलेल्या सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले. नंतर संस्थापक अध्यक्ष. गो. हू. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर परिसरात विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या ट्रस्टच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पुढील कामकाजास सुरुवात करण्यात आली.
        या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे १९९७ मध्ये झालेल्या सभेत कॉलेज ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्राचार्य भाईसाहेब गो-हू. महाजन यांनी सर्वसाधारण सभेत मत मांडले होते की, पुढील होणारी सभा भयमुक्त वातावरणात विना पोलीस बंदोबस्तात झाली पाहिजे या सुचनेला २७ वर्षांनंतर खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचे काम भरतभ माळी यांनी केले. त्यामुळे सभासद्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच उपास्थित सर्व सभासदांच्या संम्मतीने सभेत अनेक महत्वपूर्ण विषयांना चालना देण्यात आली व महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले
        त्यामाध्ये मागील सभेतील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले, ट्रस्टच्या जमा-खर्च अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली, सनदी लेखापाल यांची नियुक्ती करून मानधन ठरविण्यात आले., कार्यकारी मंडळाच्या दिनांक ६ जुलै २०२३ रोजीचा ठराव क्र. ३ नुसार सुधीरकुमार माळी व निखीलकुमार तुरखीया यांनी दाते वर्गातून सभासदांची फसवणूक व दिशाभूल करून प्रमूख दाते या प्रवर्गातून प्रतिनिधीत्व केल्याने त्यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले व लक्ष्मण बबनराव माळी तसेच रोहीत भरतभ माळी यांनी ट्रस्टला प्रत्येकी अकरा लाख, अकरा हजार एकशे अकरा अशी मोठ्या स्वरूपाची देणगी दिल्याने त्यांचे प्रमूखदाते च्या वर्गातून सभासदत्व कायम करण्यात आले
तसेच सन २०२४ ते २०२९ या कार्यकाळासाठी प्रमुखदाते, ते. अभयदाते, सहानुभूतीदार, आजीव सदस्य (अ) व 'ब'क' अशा वेगवेगळ्या श्रेणीतील प्रतिनीधींची निवड करण्यात आली.
   यानंतर उपास्थीत सर्व सभासदांनी नवनियूक्त कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.