Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरपंचाचे गावातील शाळेसाठी अर्धनग्न आंदोलन, शिक्षणाधिकारींचा लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थगित

नंदुरबार दि २३(प्रतिनिधी) जि.प.शाळा, खांडबारा येथील वर्गखोल्या दूरुस्तीबाबत पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सरपंच अविनाश गावीत यांनी जिल्हा परिषद समोर अर्धनग्न आंदोलन केले.
             खांडबारा ता नवापूर येथील आंदोलनाची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी लेखी आश्वासन दिले तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आले.
              लेखी पत्र याप्रमाणे देण्यात आले आहे. संदर्भीय विषयान्वये आज दिनांक 23/07/2024 रोजी जिल्हा परिषद आवारात आपण केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच यावेळी सादर केलेल्या निवेदनानुसार जिल्हा परिषद शाळा, खांडबारा ता. नवापूर येथील मराठी शाळेच्या 3 वर्गखोल्या व उर्दू शाळेच्या 2 वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधी मागणी करण्यात आली असुन निधी उपलब्ध होताच प्रथम प्राधान्याने या दोन्ही शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्त करण्याची कार्यवाही विना विलंब करण्यात येईल.
      कृपया आपले आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करावे.
 (वंदना वळवी)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, नंदुरबार