नंदुरबार दि २१ (प्रतिनिधी)अस्तंबा हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे,या ठिकाणी पायाभुत सुविधांची आवश्यकता आहे तरी त्यासाठी शासनाने लक्ष घालण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तांबा ऋषी देवस्थान ट्रस्ट, अस्तंबा ता. धडगांव जि. नंदुरबार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा, अस्तंबा हे नंदुरबार जिल्हयाचे धार्मिक स्थळ आहे. अस्तंवा या ठिकाणी अस्तंबात्रऋषी महाराज यांची यात्रा दरवर्षी दिवाळीला भरत असते.
यात्रेला महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात यात्रेकरु येत असतात. यात्रा ही जवळजवळ ५ ते ६ दिवस चालत असते. यात्रेला येणाऱ्या भाविकांना कोणतीही व्यवस्था व सोईसुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत असते.त्यासाठी यात्रेला येणाऱ्या भाविकांची सोय होणेसाठी आम्हाला यात्राविकास योजनेमधुन दिवाबत्ती, पाणीपुरवठा सुविधा, भाविकांसाठी भक्तनिवास, सार्वजनिक शौचालय,
महिला व पुरुषांकरिता स्नानगृह, निवाराशेड उपलब्ध करुन द्याव्यांत ही विनंती तसेच अस्तंबा या ठिकाणी असलेल्या भिमकुंडाचा विकास करण्यांत यावा असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर अध्यक्ष धिरसिंग कोचऱ्या वळवी,सचिव तुमडया खाअल्या वळवी यांच्या सह्या आहेत.