Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रहार शिक्षक संघटनेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना प्रलंबित प्रश्ना संदर्भात निवेदन, जि.प. सीईओ यांच्याशी चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविणार संघटनेस आश्वासन

प्रहार शिक्षक संघटनेमार्फत प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात निवेदन, जि.प. सीईओ यांच्याशी चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविणार संघटनेस आश्वासन 
 नंदुरबार दि. २२ ( प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सातत्याने नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनांकडून प्रशासनाकडे निवेदन देण्यात येत आहेत. अनेक महत्त्वाचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून दिलेले असताना देखील न्याय मिळत नसल्यामुळे वाडी, वस्ती, दुर्गम पाड्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत प्रहार शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून आता पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.                 जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत असलेले शिक्षकाचे प्रलंबीत प्रश्रे सोडवा; असे निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, दिपक भदाने, रमेश गावित, निदेश वळवी यांनी प्राथ. शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. ईमेल द्वारा अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई आमदार बच्चू कडू, नाशिक विभागीय कार्यालय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक घेण्यात आली असली तरीदेखील आग्रही मागणी बाबत प्रलंबित प्रश्न सुटेनासे झाल्याबाबत निवेदन यावेळी करण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावनकुमार यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत यापूर्वीही बैठका घेतल्या आहेत. आश्वासने देऊन संघटनेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने प्राधान्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविले आहे. परंतु सदर निवेदनातील प्रलंबित प्रश्न आंतरजिल्हांने बदलून आलेल्या प्राथमिक शिक्षकांना एक वेतनवाढ देणे बाबत, शिक्षकांची पदोन्नती, रिक्त पदे केंद्रप्रमुख, विषय शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अधिसूचना असणारे शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे, मागील वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षक कला क्रीडा कार्यक्रम पुरस्कार वितरण, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण करणे, जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आठ ते नऊ वर्षापासून दुर्गम भागात सेवा करत असलेले शिक्षक बांधवांना सेवा जेष्ठतानुसार सुगम पेसा भागात नियुक्ती, पवित्र प्रणालीने नवीन भरती करण्यात येत असलेल्या शिक्षक बांधवांना नवनियुक्त यांना दुर्गम भागात नियुक्ती देणे, इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या शिक्षक बांधवांची डीसीपीएस रक्कम हिशोब मिळणे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्य माल वेळेत मिळणे, किरकोळ रजा मंजुरीचे आदेश शालेय स्तरावर देणे, जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये गैर मार्गाने दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरीत शासनाची आर्थिक लूटमार, लाभ घेत असलेल्या प्राथमिक शिक्षक यांची जे.जे रुग्णालय मुंबई येथे तपासणी करणे, वेतन याबाबत अनेकदा निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक प्रलंबित प्रश्न निवेदन व आंदोलन करूनही सुटत नसल्यामुळे संघटनेमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी बैठकीनंतर शिक्षकांचे प्रश्न सुटल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सीईओ श्री. सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. डॉ. युनूस पठाण, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. निलेश लोहकरे यांचा सत्कारही करण्यात आला आहे. यावेळी शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार साहेब यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. जिल्हयातील शिक्षक ज्ञानदानाचे चांगले कार्य करत असून जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील चार हजार शिक्षकांची पालक म्हणून त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी प्रहार शिक्षक संघटनेचा आश्वासन दिले आहे. बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी तसेच शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या वाडी, वस्ती दुर्गम पाड्यातील शिक्षक बांधवांचे प्रलंबित प्रश्न,शिक्षण विस्तारा अधिकारी, केंद्रप्रमुख व रिक्त पदे ५ सप्टेंबरपर्यंत भरून जिल्ह्यातील शिक्षकांना शिक्षक दिनाची अनोखी भेट द्यावी. असेही मत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित यांनी सांगितले आहे. अन्यथा, प्रश्न सुटत नसल्यास लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल. प्रहार शिक्षक संघटनेमार्फत निवेदन प्रशासनास दिले आहे.