Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धडगाव परीसरात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा,बिरसा आर्मी चे अधिका-यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

धडगाव दि २९ (प्रतिनिधी) धडगाव परिसरातील मोबाईल नेटवर्क समस्या नेहमीचीच असल्याने नागरिकांना ऑनलाईन कामे करताना अडचणींचे ठरते तरी सेवा सुधारण्यात यावी असे निवेदन बिरसा आर्मी तर्फे तहसीलदार व भारत दुर संचार निगम ,जिओ, एअरटेल च्या अधिका-यांना देण्यात आले आहे.
               निवेदनाचा आशय असा,आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच कामे ही ऑनलाईन पद्धतीने केली जातात. त्यामुळे शैक्षणिक कामे, विदयार्थी प्रवेश फॉर्म, शासकीय दाखले, विविध कल्याणकारी योजना, बँकिंग व्यवहार, एकदंरीत सर्वच विभागातील कामे करण्यासाठी नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु भारत दूरसंचार आणि खासगी कंपन्यांचे नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने दुर्गम भागातून शैक्षणिक व विविध फॉर्म भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना नेटवर्क अभावी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. परिसरातील नागरिकांचे महत्वाचे कामे खोळंबली जातात. विदयार्थ्यांचे शैक्षणिक, नोकरी संदर्भातील फॉर्म व इतर विविध योजनेपासून नागरिकांना वंचित राहावे लागते. त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून मोठा परिणाम होत आहे.
         तरी संबंधित विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी ही विनंती. अन्यथा, बिरसा आर्मी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
         निवेदनाचा प्रती 
खासदार ॲड गोवाल के. पाडवी, लोकसभा, नंदुरबार
ॲड के. सी. पाडवी, आमदार, अक्कलकुवा-अक्राणी यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर कुवरसिंग पराडके (उपाध्यक्ष), राजेंद्र पावरा (सचिव)
पिंट्या वळवी (सहसचिव), रतिलाल पराडके,डेटका राहसे,डेबा पाडवी,मोतीराम वळवी, वेलच्या वळवी,राजू पाडवी,अनिल वळवी,नितीन वळवी आदींच्या सह्या आहेत.