----------------------------------------
नंदुरबार दि ३१ (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळा लहान शहादे ता . जि. नंदुरबार येथे शिंदे केंद्राचे शिक्षण परिषद पुष्प 1ले हे गुंफले गेले.गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे यांच्या प्रेरणेने व केंद्राचे केंद्र प्रमुख मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी लहान शहादे येथील सरपंच श्रीमती ममता ताई, शा. व्य. स. अध्यक्ष संजू भाऊ भील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सूत्रसंचालन सामनसिंग वळवी सर यांनी केले सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. . प्रतिमा पूजन मान्यवरांनी केले तसेच, स्वागत गीताने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
विषय पत्रिका नुसार शिक्षण परिषद मागोवा* मा.केंद्रप्रमुख मनोज पवार सर यांनी घेतला. PAT विषयी मार्गदर्शन संतोष एकलारे सर यांनी सादर केले. रूटीन कार्यक्रम बाबत मार्गदर्शन मनीष वसावे सर यांनी मार्गदर्शन केले .विद्या प्रवेश कार्यक्रम बाबत मार्गदर्शन अनिल माळी सर यांनी केले. केंद्र संसाधन गट व शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण याबाबत मार्गदर्शन उमेश बेडसे सर यांनी केले.आनंदी शनिवार बाबत चर्चा व मार्गदर्शन यशवंत पाडवी सर यांनी केले .तंबाखू मुक्त शाळा निकष बाबत मार्गदर्शन रमेश पावरा सर यांनी ॲप डाऊनलोड व निकष विषयी सविस्तर माहिती दिली, महा वाचन चळवळ बाबत मार्गदर्शन महेंद्र परमार सर यांनी सविस्तर माहिती देऊन परिपत्रक वाचन केले, गुगलफॉर्म,एक्सेल शीट, ऑनलाईन कामकाज बाबत
योगेश हरेज सर यांनी सविस्तर माहिती दिली, मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा टप्पा २ बाबत, केंद्रप्रमुख मनोज पवार सर यांनी परिपत्रक वाचन करून सर्व शाळा सहभागाचे आवाहन केले, इतर प्रशासकीय सूचना तसेच मार्गदर्शन केंद्रप्रमुख मनोज पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता भामरे, रजनी कोकणी, सामनसिंग वळवी व नयना पाडवी तसेच शालेय व्यवस्थापन समिती लहान शहादे यांनी परिश्रम घेतले. अहवाल लेखन तुषार देवरे यांनी केले.