नंदुरबार दि२५ (प्रतिनिधी) येथील जी. टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेना विभाग तर्फे *'एक पेड मां के नाम'* या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विभागातर्फे एकूण 25 वृक्षांचे रोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात आली. यावेळी प्राचार्यांनी निसर्ग वाचवण्यासाठी व त्याचे संगोपनासाठी वेळोवेळी सर्वांनी वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय छात्र सेना विभागाने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने केल्याबद्दल कौतुकही केले. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी सुद्धा वृक्षारोपण करून एकूण उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे व एक झाड देशासाठी व निसर्गासाठी लावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
परिणामी सर्व विभागांनी प्रत्येक झाड दत्तक योजनेची सुरुवात करत आपापल्या विभागातर्फे दत्तक झाडाचे संगोपन करण्यात येईल. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. यु. पाटील, उपप्राचार्य डॉ.संदीप पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. टी. जी. पाटील यांनी सुद्धा एक एक वृक्षारोपण करून सर्व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना अशा उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले अमूल्य योगदान करावे असे आवाहन केले.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या एक पेड मां के नाम या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचा जास्तीत जास्त वृक्षारोपण करून समाजाला निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचा मानस आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट. डॉ. विजय चौधरी व 54 छात्र सैनिक यांनी परिश्रम घेतले. 49 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अमळनेर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बानिक पिनाकी यांनी महाविद्यालयाचे व विभागाचे अभिनंदन केले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ.दिनेश देवरे , डॉ.उपेंद्र धगधगे व डॉ.मनोज शेवाळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. तारक दास, समन्वयक डॉ. एम. आर. पाटील, गणित शास्त्र विभाग प्रमुख डॉ संगीता पिंपरे, डॉ माधव कदम, प्रा एम बी पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव सुदेश रघुवंशी व सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. तर छात्र सैनिकांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.