सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि २६
उल्हासनगर येथील व मुंबई क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळाचे व्यवस्थापक श्री.गजानन सुकदेव महाजन हे गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेच्या परिवहन (वाहतूक) विभागात वाहक म्हणून कार्यरत आहेत.दिनांक २३/७/२०२४ रोजी कोलशेत येथे ड्युटीवर असतांना बसमध्ये एका प्रवाश्याचे पाकिट त्यांना मिळाले.त्या पाकिटात रुपये १५००० व महत्वाची कार्डस देखील होते. सदर पाकिट गजानन महाजन यांनी राकेश सिंग या प्रवाश्याला महापालिका वाहतूक अधीक्षक श्री.संजय सोनवणे व सहाय्यक अधीक्षक श्री.सुनिल साठे यांच्या उपस्थितीत परत केले.गजानन महाजन यांच्या या प्रामाणिक कामगिरीचे ठाणे महापालिका वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.या लक्षणीय कामगिरीबद्दल माळी समाज बंधू -भगिनींनी गजानन महाजन यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला.प्रा.प्रकाश माळी सर यांनी गजानन महाजन यांच्या अभिनंदनीय कामगिरीबद्दल त्यांच्या घरी जाऊन गजानन महाजन व त्यांच्या पत्नी सौ.सुरेखा महाजन यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.