नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार विभागांतर्गत असलेल्या शहादा प्रकल्पांतर्गत लघु पाटबंधारे योजना चिरडा, या प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत पाणी पातळीत 121.00 मी. ची नोंद झाली आहे. या प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे उमरी नाला काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपुर व इतर गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
तसेच शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी 309.20 मी. ची नोंद झाली आहे. प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे वाकी नदी काठावरील विरपुर, रामपुर, फत्तेपुर, शिरुड त. हवेली, कानडी त. हवेली, चिखली, औरंगपुरा, कोठली त. हवेली, परिवर्धा, वैजाली, नांदर्डे व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.या क्षेत्रातील नदी व नाला पात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने पात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.