दि २३/०७/२०२४ रोजी विधानभवन येथे मा. ना. नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरती व त्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या बाबत बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांतील भरती थांबली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रिया बाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे निर्देश दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या १३ जिल्ह्यांतील १७ संवर्गातील भरतीप्रक्रिया प्रभावित झाली आहे.यावर विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती.त्यात उपस्थित आमदार राजेश पाडवीं,विधान परिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री मा. अशोकजी उईके, मा. आ. सौ. मंजुलाताई गावीत, मा. आ. कांशीराम पावरा, मा. आ. भिमराव केराम, मा. आ. भुसारा, मा. आ. श्री. राजेश पाटील, मा. आ. श्री. श्रीनिवास वनगा, मा. आ. तथा आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.