Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन 
तळोदा दि १८ (ता प्र) राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेत मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली थोर समाज सुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम सम्पन्न झाला.
       सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
 नंतर राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर व मा.गांधी इंग्लिश स्कूल खापर शाळेचे चेअरमन प्रभाकर संभु चौधरी, संचालिका सौ.रत्नाताई प्रभाकर चौधरी, उपाध्यक्ष योगेश भाऊ प्रभाकर चौधरी, माजी उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्री ताई योगेश चौधरी यांच्या थोर समाजसुधारक,लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आलेल्या अभिवादन पर संदेशाचे वाचन करण्यात आले.त्या नंतर मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.
       सूत्र संचालन श्रीमती एस पी वसावे मॅडम यांनी केले.या वेळी जेष्ठ शिक्षक ए एन चौधरी सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.