मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन;आंदोलनाचा इशारा
तळोदा दि २२ (प्रतिनिधी) सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी स्थानिक बेरोजगारांची नियुक्ती करावी;यासाठी बिरसा आर्मीने मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यत अनुसूचित जमाती रिक्त पदांवर तात्पुरता स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.गेल्या अनेक वर्षापासून आदिवासींची हजारो रिक्तपदे सरकार भरत नसल्याने स्थानिक आदिवासी बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
असे असतांना सरकार वारंवार चुकीचे आदेश काढून बेरोजगारांची खेळत आहे.हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खासगीकरण करण्याचा डाव आहे.शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक स्थिती लक्षात घेऊन सेवानिवृत्ती वय ५८ वर्ष असतांना पुन्हा सेवानिवृत्ती शिक्षकांची तात्पुरता स्वरूपात नियुक्ती करणे कितपत योग्य आहे?असा प्रश्न उपस्थित केला आहे.शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त करण्याचा नियम क्रमांक १ ची सूचना ताबडतोब मागे घेऊन स्थानिक आदिवासी बेरोजगारांची नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.अन्यथा,स्थानिक बेरोजगारांसह बिरसा आर्मी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे जिल्हा सहसचिव नवनाथ ठाकरे,विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण,तळोदा प्रवक्ता रमाकांत वळवी,अनिल ठाकरे,हेमंतकुमार वळवी,सुनील गावीत आदी. पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.