Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार आमश्यादादा पाडवी व प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्रयत्नातून अनुसूचित जमाती प्राथमिक शिक्षक २७४ रिक्त पदे नियुक्तीच्या पाठपुराव्याला यश.

 आमदार आमश्यादादा पाडवी व प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्रयत्नातून अनुसूचित जमाती प्राथमिक शिक्षक २७४ रिक्त पदे नियुक्तीच्या पाठपुराव्याला यश.        
नंदुरबार, दि.१३ (प्रतिनिधी) - अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षकांवर नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून परिषद अन्याय होत होता. जिल्हाअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या ३०० जागा रिक्त असताना देखील त्या जागा नियंत्रणेकडून शिक्षक बदली पोर्टलला दाखवल्या जात नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त असल्यामुळेच पेसाच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी विधान परिषद आमदार आमश्यादादा पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या कडे लेखी निवेनाद्वारे करण्यात आली होते. 
           आमदार आमश्यादादा पाडवी यांनी मुंबई येथे विधान परिषद मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील पेसा क्षेत्रात शिक्षक भरती व्हावी यासाठी मागणी केली. 

       या प्रयत्नाला यश आल्याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेने विधान परिषद आमदार आमश्यादादा पाडवी यांचे प्रहार संघटनेमार्फत अभिनंदन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील  शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने शिक्षण विभागाने आता यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती साठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी गुणवत्ताधारक, तसेच रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक यादी आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागांवर कंत्राटी शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. मात्र, या क्षेत्रातील उमेदवारांचा डी. एड, बी. एड. असा वाद उभा राहिला. हा वाद अगदीच टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला. यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रियेलाच राज्य शासनाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत, अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील ‘पेसा’ क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली होती. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे. त्यानुसार ‘पेसा’ क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियेत निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजारांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत. टेट-२०२२ शिफारसपात्र उमेदवारांना संधी द्यावी, त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातींद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी, कंत्राटी शिक्षक भरतीप्रक्रिया महिनाभरात पूर्ण  करावे असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले होते. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हा अध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, शिक्षण सभापती गणेश दादा पराडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ सहाय्यक जाधव नाना, कनिष्ठ सहाय्यक सतीश गावित, शिक्षण विभाग लिपिक परेश वळवी तसेच सोशल न्यूज मीडिया प्रसार माध्यमांचे प्रहार शिक्षक संघटनेमार्फत आभार मानले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षकांवर अन्याय झाला होता. अनुसूचित जमातीच्या २७४ जागा रिक्त पदासाठी जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशी ही माहिती जि.प सीईओ सावनकुमार यांनी दिली आहे. जि. प. यंत्रणेकडून भरती करण्यात येत नसल्यामुळे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पोर्टल वरील सर्व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागा सुधारीत आवश्यकतेनुसार विन्सेस आय.टी सर्विसेस प्रा. लिमिटेड पुणे कंपनी कडून मंजूर करण्यात आलेले आहे. त्या रिक्त पेसा क्षेत्रातील सर्व जागेवर अनुसूचित जमाती शिक्षकांची भरती करण्यात यावी. अनुसूचित जमाती शिक्षक बांधवांच्या जागा आपल्या प्रशासनाकडून दाखवल्या न गेल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही प्रहार शिक्षक संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत. बिंदू नामावली घोटाळा झाला होता.  बाब निर्दशनास शासनाचे आदेश असताना देखील त्यांचे पालन करण्यात आलेले नव्हते. नवीन पदभरती पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमातीच्या हक्काच्या जागा वगळल्या जात असल्याची गंभीर बाब निर्दशनास येत आहे, असा गंभीर आरोप प्रहार शिक्षक संघटनेने केला होता. याबाबत वस्तुस्थिती असल्यास यामध्ये हस्तक्षेप करून तात्काळ पोर्टलवरील बिंदू नामावली सन २०२२- २३ नुसार रिक्त पदे भरण्यात यावी. याकरिता प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हा परिषद नंदुरबार येथे आदिवासी पारंपारिक तूरवाद्य आंदोलन करण्यात आले होते. अन्यायग्रस्त युवकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल पवित्र पोर्टल शिक्षक बंधू भगिनी यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे तसेच प्रशासनाचे आभार मानले आहे.