Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कल्याणाच्या ध्येयाने झपाटलेले अतुलनीय नेतेः- डॉ. विजयकुमार गावित , विकासाचा महामेरू,बहुत जणांशी आधारु

 कल्याणाच्या ध्येयाने झपाटलेले अतुलनीय नेतेः- 
डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार दि १५ (प्रतिनिधी) आमचे सर्वांचे लाडके साहेब म्हणजे, डॉ. विजयकुमार गावित हे गतिमान लोकविकासाचे अजोड कर्तृत्व लाभलेले एकमेव नेते आहेत; ज्यांच्या व्यक्तीमत्वाला असंख्य पैलू लाभलेले असून ते खरोखरचे लोकनेते आहेत. 
कवडीचाही लोकविकास न करणारे फुटकळ राजकीय पुढारी आजकाल सहजपणे लोकनेता अथवा कार्यसम्राट हे बिरूद मिरवतात. परंतु डॉ. विजयकुमार गावित हे खरोखरचे कार्यकर्तृत्व लाभलेले उत्तुंग नेते आहेत. राजकारणाच्या आकाशपटलावर आपल्या विकासकार्याचे उंचच उंच मनोरे रचणारा असा दुसरा 'लोकनेता' येथे होणे नाही ! हे म्हणणे अतिशयोक्तीचे नसून मोठे वास्तव आहे. 
      आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जनसमुहांचे कल्याण करणारे जे एकामागून एक धडाकेबाज निर्णय त्यांनी केले त्यावरून या म्हणण्याचा अंदाज यावा. मितभाषी तरीही सुसंवादी, वागण्या बोलण्यात अॅटीट्यूड न ठेवता सर्व प्रकारच्या लोकांना आपलेसे करणारे, सहकार्याला तत्पर राहून वंचितांना साथ देणारे, त्याच बरोबर प्रचंड संयमीत राहून दूरदृष्टीने निर्णय करणारे आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विश्वास जिंकणारे व्यक्तीमत्व त्यांना निसर्गतः लाभलेले आहेच. सलग दिवस-रात्र न झोपता कार्यरत राहण्याची प्रचंड कार्यक्षमता आणि लोकांच्या कामातच मग्न राहण्याची आवड देखील त्यांना निसर्गतःच लाभली आहे. दिनदुबळा वर्ग प्रगतीपथावर आला पाहिजे, आदिवासी असो की बिगर आदिवासी ज्याच्या हक्काचे जे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे; ही त्यांची विचारधारा असून लोकांचे काम; हा जणू त्यांचा श्वास बनला आहे. दिवसभर विविध बैठका, चर्चा, सभा सलगपणे पार पाडता पाडता भेटायला आलेल्यांचे म्हणणे सविस्तर ऐकणे, संबंधीत अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क करून गुंता सोडवणे ते करतातच, दुरगामी नियोजनाच्या संदर्भाने भेटी गाठीसाठी घेत मध्यरात्रीपर्यंत न थकता हे गाव ते गाव फिरतात. शिवाय पहाटेच्या वेळेत अल्प झोप घेऊन लगेचच आलेले अर्ज, पत्र तपासत बसतात. रेल्वे प्रवास असो की कारने प्रवास असो दुरध्वनीवरील संपर्क करणे, कागदपत्र वाचून फाईली हाताळणेसुध्दा चालू राहते. हे सर्व कशासाठी? तर, जनविकासाच्या कामांना गती देण्यासाठी.. दिवसा, रात्री आणि पहाटेसुध्दा सतत लोकांसाठी कार्यरत राहणारे हे असे नेतृत्व अजोड आणि अतुलनीयच म्हणावे!

प्रत्येक निर्णय दुरदृष्टीने घेतलेला, प्रत्येक काम जनसमुहाच्या हिताचे केलेले, प्रत्येक काम इतिहास रचणारे, ही त्यांच्या राजकीय वाटचालीची खासीयत सांगता येइल. जसे की, राजकारणात पदार्पण केल्या बरोबर नंदुरबार जिल्हानिर्मिती करून त्यांनी दुर्गम भागातील आदिवासींच्या दारी प्रशासन आणले. लहान मोठ्या कामांसाठी शेकडो मैल पायपीट करणाऱ्या आदिवासी बांधवांना गावातच न्याय उपलब्ध करून दिला. हा मोठा इतिहास घडला. पुढे मंत्री बनल्यावर आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातून निर्णय करतांना त्यांनी अशी काही जादू घडवली की, जिथे पायी जाणे शक्य नव्हते, तिथे पक्के डांबरी, सिमेंटचे रस्ते बनले, धरण बांधले गेले, शेती सुजलाम सुफलाम बनली. फाटक्या लंगोटमधे दिसणारे कुपोषण, अनारोग्य झेलणारे आणि धनधान्यासाठी पडेल ती चाकरी करणारे असंख्य आदिवासी समुह आज चकचकीत चारचाकीचे आणि घरबंगल्यांचे मालक बनलेले पहायला मिळतात. हाही इतिहास एकमेव डॉ. गावित यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून रचलेला. यात अतिशयोक्ती अशी काहीच नाही. २५ वर्षापूर्वीचा मागास, अविकसीत नंदुरबार जिल्हा ज्यांनी पाहिलेला, त्यांना हे नक्कीच कळू शकते. आज टोलेजंग इमारती, बहुविध व्यवसायांनी आणि भव्य प्रशस्त स्थळांनी नटलेला नंदुरबार जिल्हा पहायला मिळतो. मंत्रीपदांचा लाभ करून देत या जिल्ह्याचा त्यांनी संपूर्ण कायापालट घडवला. बालमृत्यू कमी झाले. आरोग्य सेवा सुदृढ करणारा निधी आणि सुविधा आल्या. रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेपर्यंतचा विकास त्यांनीच साधला. शहराला उड्डाणपुल दिले, नाट्यमंदिर उभारायला निधी दिला, ग्रामीण रस्त्यांच जाळं विणलं, जलशुध्दीकरण केंद्र दिले, प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजसह छोट्या मोठ्या सिंचन योजना पूर्णत्वास आणल्या. कोटी कोटीचे विकास निधी त्यांनी मिळवून दाखवला. म्हणूनच मतदारांनी त्यांना वारंवार निवडून दिले. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता तब्बल आठ वर्ष डॉ. विजयकुमार गावित हे मंत्रीपदावर नव्हते. परंतु त्या काळात हा जिल्हा पूर्ण ओस पडलेला दिसला. ना कोणताही ठोस निधी ना कोणतेही ठोस विकास काम काहीही होतांना दिसलं नाही. त्या काळात गावित परिवाराच्या सर्व विरोधकांचा नाकर्तेपणा उघड झाला. 
            डॉ.गावित हे करु शकतात, कारण लोकविकासावर आधारलेले सकारात्मक राजकारण, हे या मागचे गमक आहे. लोकसमुहांना विकासाच्या मार्गावर आणणारे रचनात्मक राजकारण करण्यात यशस्वी झालेले नामदार डॉ. गावित हे एकमेवाद्वितीय नेते आहेत. असे असतांना विद्यमान स्थितीत कटकारस्थानातून आणि व्यक्तीद्वेषातून त्यांच्या विकास रथाला अडथळे आणले गेले, हे दुर्दैव आहे. परंतु इतरांचे नाकर्ते नेतृत्व स्विकारून काहीही साध्य होणार नाही, हे लोकांना अल्पावधीतच लक्षात येऊ लागले आहे. नामदार डॉ. विजय कमार गावित यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या आणि त्याच धाटणीची वाटचाल करणाऱ्या कन्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची राजकीय कारकिर्द याहून निराळी नाही. लहान लहान दुर्लक्षीत घटकांना आर्थिकविकासापासून सर्व काही देणारे राजकारण त्यांनी साधले आहे.
           आताच्या शिंदे-फडणवीस सरकारमधे आदिवासी विकास खात्याचं मंत्रीपद मिळून त्यांना दोनच वर्ष झाले. तरी मागील २० वर्षात कोणताही नेता देऊ शकला नाही, इतका निधी या अल्प काळात त्यांनी जिल्ह्याला मिळवून दिला. आदिवासी मुलांच्या निवासी शाळांना स्वमालकीच्या इतारती उभारून मिळताहेत. दुर्गमभागातील आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाताहेत. आदिवासी वसतीगृह असो निवासी शाळा असो लॅपटॉप, टॅब, वॉटरफिल्टर आदी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज बनवले जात आहेत. गोरगरीब जनतेला मोफत नेत्रचिकित्सा आणि शस्त्रकिया करून दिल्या जात आहेत. भाजपाने उशिराने दिलेली मंत्रीपदाची संधी डॉ. विजयकुमार गावितांच्या कार्यकक्षा जितक्या वाढवणारी, तितकीच ती भारतीय जनता पार्टीलाही अधिक लाभदायी ठरलेली दिसते. आदिवासी विकास खात्याच्या चमकदार कामगिरीतून संपूर्ण राज्य ते पहात आहे. नंदुरबारचं मागासलेपण सांगायला पुढे आलेल्या एका तरी माजी मंत्र्याच्या हातून अशी कामगिरी घडली आहे का? ही तुलना लोक नक्कीच करतील. नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या लोकविकासाच्या राजकारणाला जिवंत ठेवण्याचा संकल्प करणे, हीच या लोकनेत्याच्या आजच्या वाढदिवसाला खरी शुभेच्छा ठरेल ! *- जे. एन. पाटील, तालुका अध्यक्ष, भाजपा नंदुरबार.*