Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवी बुडकी व जि.प.शाळा येथे स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने साजरा, विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे वाटप

ग्रामपंचायत बुडकी व जि.प.शाळा नवी बुडकी येथे स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा
   शिरपूर दि १५ (प्रतिनिधी) अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवाकडे वाटचाल करीत असतांना आदर्श जि.प.शाळा नवी बुडकी ता.शिरपूर जि.धुळे याशाळेत भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन  साजरा करण्यात आला.
          स्वातंत्र्यदिन कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवी बुडकी गावाचे सेवानिवृत्त माजीसैनिक विजय देवसिंग पावरा यांनी भूषविले.शाळेचे ध्वजारोहण शा.व्य.स.अध्यक्ष चंद्रसिंग सोमा पावरा व उपाध्यक्ष प्रकाश शिवराम पावरा यांनी केले.नवी बुडकी ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण नवागावचे सध्या भारतीय सैन्यदलात सेवेत असलेले सैनिक राहुल प्रधान पावरा यांचे हस्ते करण्यात आले.
        या राष्ट्रीय कार्यक्रमप्रसंगी थोर महापुरुष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नवी बुडकी गावाच्या सरपंच सौ.इंदिराताई विश्वास पावरा यांनी माल्यार्पण करून प्रमुखांच्या उपस्थितीत महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी आदर्श जि.प.शाळा नवी बुडकी ता.शिरपूर जि.धुळे याशाळेतील विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे, देशभक्तीपर गीते,राष्ट्रीय गीते तालासुरात सादर करून उस्फुर्तपणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोपानराव पांडुरंग पाटील सर यांनी तर अनुमोदन गजानन ओंकार जाधव सर तर प्रास्ताविक राजेंद्र पाटील सर यांनी केले दिले.शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सादरीकरणाबद्दल पदाधिकारीगण व ग्रामस्थांकडून ३०००/- रूपयांची रोख पारितोषिके मिळाली.या कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत नवी बुडकी यांचेकडून १६८ विद्यार्थ्यांना वही,पेन,चित्रकला वही,स्केचपेन,शिसपेन्सिल इ.शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.छायाचित्रणाचे कामकाज प्रदीप भिका सोनवणे सर तर उपस्थितांचे आभार श्री कैलास साहेबराव पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारीगण, ग्रामसेवक भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवाभावी ग्रामस्थ,शाळेचे सर्व शिक्षकवृंद व बालभगवंतस्वरूप विद्यार्थ्यांचे उस्फुर्त सहकार्य लाभले. याप्रसंगी दानशूर ग्रामस्थांकडून मिळालेल्या गोळ्या,चाॅकलेट व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.