Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती आणि वर्धापन दिनानिमित्त दत्तमंदिर येथे जागर सभा संपन्न

विश्व हिंदू परिषद संघटनेच्या षष्ठी पूर्ती आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रमा निमित्य जागर सभा दिनांक २६/०८/२०२४ रोजी श्री दत्त मंदिर तळोदे येथे मोठ्या संख्येने संपन्न झाली.
              प्रखंड गोरक्षा प्रमुख  शेजारी अनुराग सक्सेना, प्रखंड कोषाध्यक्ष मुकेश जैन, राजू चौधरी उपस्तित होते.कार्यक्रमात प्रमुख वक्ते वि हीं प चे समाजिक समरसता देवगिरी प्रांताचे प्रमुख  परुषोत्तमजी काळे सर होते.प्रमुख पाहुणे  मनीष सुगंधी, माजी तालुका कार्यवाह भास्कर माळी,वि ही प प्रांत सह संपर्क प्रमुख विजय सोनवणे, जिल्हा सेवा प्रमुख डॉ शांतीलाल पिंपरे, प्रखंड अध्यक्ष राजाराम राणे, शहर मंत्री श्री पवनकुमार शेलकर,प्रखंड मंत्री हृषीकेश बारगळ उपस्थित होते.
         काळे सरांनी भारतावर झालेले प्रथम इस्लामिक आक्रमण त्यात हिंदू राजे यांचे जय पराजय याची इतिहासाने दखल न घेतलेली माहिती दिली. वि हीं परिषद ची स्थापना २१/०५/१९६४ झाली. या साठ वर्षात वि हीं प ने काय काम केले आणि या संघटणेचा उद्देश काय आहे याची पूर्ण माहिती दिली.
            या कार्यक्रमात आलेले अथीतीं चे स्वागत राजन पाडवी, शिरीष मगरे, यांनी केले. अतिथी व पदाधिकारी यांचा परिचय श्री भूपेंद्र बारी यांनी करुन दिला. मंचाची, बैठकीची व्यवस्था यशराज बारगळ, मोहन परदेशी यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री धनंजय सुर्यवंशी यांनी केले.