Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

“आलारे आला गोविंदा आला” च्या गर्जनेत नंदुरबारच्या जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

 “आलारे आला गोविंदा आला” च्या गर्जनेत नंदुरबारच्या 
जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

नंदुरबार दि २७ (प्रतिनिधी) कैलासवासी शांतीसागर सुपडू पहेलवान यांची जय बजरंग व्यायाम शाळा आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उस्ताहात पार पडला.

         “आलारे आला गोविंदा आला”च्या घोषणा देत ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत आलेल्या विविध व्यायाम शाळा व मंडळाच्या गोविंदांनी यात सहभाग नोंदवला.
          सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. शहरातील संकटमोचन हनुमान व्यायाम शाळा, गांधी नगर, जाणता राजा चौक मित्र मंडळ, गुरुकृपा होलार सेना, श्री द्वारकाधीश व्यायाम शाळा, होलार समाज व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर व्यायाम शाळा, दिगंबर नरसी पाडवी प्रेरित आदिवासी व्यायाम शाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, शक्तीसागर युवक मंडळ, बिरसा पॉवर व्यायाम शाळा, श्री संत सावता व्यायाम शाळा या मंडळांचा समावेश होता. या मंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..          कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  किरण खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक  विकास गुंजाळ,  संजय भदाणे,  प्रतापसिंग राजपूत, किरण चौधरी, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री विश्वनाथ मराठे, रीद्धेश सोलंकी, विक्की माळी, गिरजा गवळी, भिका भावसार, श्रीमती भावना कदम, क्षितीज लवांदे, शंभूराजे कदम, देवा कदम, ओम बडगुजर, तुकाराम मराठे, शेखर मराठे, देवेंद्र बोरसे यांनी परिश्रम घेतले.