Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नयामाळ येथील अंगणवाडी सेविकेचा चित्तथरारक प्रवास, सातपुडा पर्वतातील पावसाळी स्थिती

 दि २८ ( प्रतिनिधी) अतिदुर्गम भागातील अंगणवाडी केंद्र नयामाळ बीट शिर्वे येथील सेविका वंती हिम्मत वळवी ही नाल्याला पुर आल्याने झाडावर चढुन नदी पार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असुन तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

           या पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असुन सातपुडा पर्वतराजीतुन वाहणारे सर्वच ओढे नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.अती दुर्गम व अश्या अतिशय कठीण परिस्थितीत नदी दुथळी भरुन वाहत असताना झाडावर चढून खुप मोठा धोका पत्करून सेक्टर मिटिंगला निघाली .



        दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची सेक्टर मिटिंग होते यांत पुर्ण महिन्याभरातील कामाचा आढावा घेतला जातो.यांत जन्म- मृत्यू, गरोदर माता किती, लसीकरण, आहार वाटप, दिवस कुपोषित, माता बालक वजन, उंची, किशोरवयीन मुली, सर्व माहीतीचा आढावा घेतला जातो.व त्यानुसार अंगणवाडीला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.आपल्या केंद्रातील,बालक, महिला लाभापासून वंचित राहू नये म्हणून सदर महिलेने दुथडी भरून वाहणारी नदी, त्यावरून अल्याड पल्याड ओणव्या झालेल्या झाडावरून तोल सांभाळत पैलतीर गाठला.
          अंगणवाडी सेविका मानधनावर काम करते.पण आपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणातुन तिच्या जीवाची परवा न करता शासनाच्या कामाला जीव धोक्यात घालून,नयामाळ ते इच्छागव्हाण पायी चालत व इच्छागव्हाण ते सोमावल सभेला भर पावसात पोहचली.
       प्रतिक्रिया - यावर बोलताना वंती वळवी म्हणाली शासनाने आमचा वेतनाचा विचार करायला पाहिजे. मागे दोन महिने संप केला पण काहीच दिले नाही. उलट संप काळातील आमचे दोन महिन्याचे मानधन कापून घेतले. शासनाला एकच विनंती आहे की आम्ही आमचा जीवाची पर्वा न करता काम करतो आहे तर आम्हाला शासनाने थोडे मानधन वाढवून दिले पाहिजे.