Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मांजरपाडा पाणी प्रकल्पाचे आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेस जलचिंतन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. मोहन शेलार.

राष्ट्रवादी काँग्रेस जलचिंतन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. मोहन शेलार.
येवला दि २९ नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) :- 
 *मा ना छगनरावजी भुजबळ साहेबांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..* 
 जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पगार यांच्या उपस्थितीत निवड
             मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आंदोलक, येवला पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. गटनेते बाजार समितीचे मा. संचालक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व समता परिषदेचे मा. तालुकाध्यक्ष डॉ. मोहन शेलार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जलचिंतन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
      महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते डॉ. मोहनबापू शेलार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मोहन शेलार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नियुक्तीनंतर मा खा. श्री समीर भुजबळ, मा.आ. पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष  रवींद्रनाना पगार यांनी ही निवड केली. डॉ. मोहन शेलार यांचे जलसंधारणातील काम व मांजरपाडा व इतर प्रकल्पातील आंदोलक म्हणून पार पाडलेली कामगिरी एकूणच जलसंधारणातील अभ्यास गृहीत धरून त्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, येवला तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, युवा नेते मकरंद सोनवणे, समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, माजी कृउबा समिती उपसभापती गणपतराव कांदळकर, मा. संचालक कृउबा समिती देविदास शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन गायकवाड, समता परिषद तालुकाध्यक्ष डॉ प्रवीण बुल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष भगवान ठोंबरे, मा.सरपंच अशोक बंदरे, यमाजी शेलार, अरुण ठोंबरे, अंबादास पगार, मुखतार दरवेशी, करीम दरवेशी, धर्मा पारखे,राकेश शेजवळ, रवींद्र शेलार, नंदू भुजाडे, योगेश पगार, राहुल शेलार,सदाशिव शेलार, बबलू मढे,जालिंदर शेलार, नामदेव पगार, कैलास जेजुरकर, अशोक खांडेकर, बाळासाहेब बुल्हे सम्राट बंदरे आदी यावेळी उपस्थित होते.