या शिबीरात विचारधारा फाऊंडेशनचे संचालक श्री. तात्याजी पवार सर यांनी राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही व सर्वधर्म समभाव इत्यादी मूल्यांचे स्पष्टीकरण देऊन भारतीय संविधानात नमुद असलेल्या नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत माहिती दिली. सुशिक्षित आदिवासी तरुणांनी भारतीय संविधान समजून घेत त्याची व्यक्तिगत व सार्वजनिक जिवनात अंमलबजावणी करावी व इतरांना देखील संविधान समजावून सांगितले तर आदिवासी समाज जागृत होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त होईल. अशी आशाही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
संस्थेमार्फत शिबिरात निवडक कम्युनिटी लिडर्संना "भारतीय संविधान" हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.
प्रबोधन शिबीरात चुलवड येथील उपसरपंच श्री.राजेंद्र पावरा, गौऱ्या येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.कुवरसिंग पराडके , बोदला येथील डॉ.भरत वळवी तसेच आचपा व भोगवाडे खुर्द येथील युवक सत्तरसिंग पावरा व दीपक पावरा इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले.
तसेच इतर युवकांना थोडा वेळ काढून समाजाला जागृत करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे परिसरातील गावांमध्ये लोकजागृतीसाठी दरमहा बैठकांचे आयोजन करण्याचे निर्णयही सर्व कम्युनिटी लिडर्संनी एकमताने घेतला.शिबीरात सूर्यपूर, कामोद खुर्द, बोदला, मनखेडी बुद्रुक, आचपा, नवागाव, गौऱ्या, खरवड, कुसुमवेरी व भोडवाडे खुर्द इत्यादी गावातील सुमारे २५ युवकांनी सहभाग घेतला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी विचारधारा फाँऊंडेशनचे श्री. राहुल पावरा यांनी परिश्रम घेतले.....!!