उल्हासनगर दि ३१ (प्रतिनिधी) जनराष्ट्रीय रेल्वे शू शाहीन कामगार युनियन यांच्या वतीने मुंबई येथील कस्तुरबा महिला मंडळाच्या सभागृहात संपन्न झालेल्या महागौरव सोहळ्यात देशहितासाठी आपापसात,समाजासमाजत तेढ निर्माण होऊ देऊ नका असा अमूल्य संदेश देत स्वातंत्र्य,समता,बंधुता,सामाजिक न्याय व समाजवादी विचार मांडणारे राष्ट्रसंत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून उल्हासनगर येथील जनसेवक,मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान(स्वायत्त) महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी सर यांना राष्ट्रस्तरीय *राष्ट्रसंत शिरोमणी श्री रोहिदास महाराज पुरस्कार २०२४* आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज अध्यक्ष हिंदू संत परिषद मॉरिशस,हभप नामदेव हरड महाराज उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू महासभा यांच्या शुभहस्ते आणि मा.अभिजित राणे अध्यक्ष धडक कामगार युनियन,मा.नंदकिशोर खानविलकर अध्यक्ष जनरल एम्प्लॉईज असोसिएशन,मा.अनिता शुक्ला अध्यक्ष भारतीय महिला कामगार मंच,दत्ताभाऊ जवळगे उद्योजक-निर्माता-दिग्दर्शक व तृप्ती अहिरे सिनेअभिनेत्री यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सिताराम शेट्टी प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस,किसन बोंद्रे समाजसेवक,सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था व दिपक कालिंगण राष्ट्रीय अध्यक्ष जनराष्ट्रीय शू शाईन कामगार युनियन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.