Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्र उभारणी, विकास आणि प्रगती ही देशातील तरुणांच्या योगदानावर अवलंबून असते - प्रा जयपालसिंह शिंदे

राष्ट्र उभारणी, विकास आणि प्रगती ही देशातील तरुणांच्या योगदानावर अवलंबून असते - प्रा जयपालसिंह शिंदे
 तळोदा दि १३ (प्रतिनिधी)कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि जिल्हा एड्स प्रतिबंध कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त प्रा जयपाल सिंग शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
          त्यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात उपस्थित विद्य्यार्थी यांना उदेशुन सांगितले की राष्ट्र उभारणी, विकास आणि प्रगती ही देशातील तरुणांच्या योगदानावर अवलंबून असते. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते.
             अशा परिस्थितीत तरुणांचा विकास आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या समजून घेणे आवश्यक आहे. तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजेत, जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील त्यामुळेच राष्ट्र उभारणे भारताला शक्य होणार आहे.

            यावेळी त्यांनी युवकांच्या असलेल्या भूमिका युवकांचे असलेले कार्य व्यसनापासून युवकांनी दूर कसे राहावे विद्यार्थ्यांनी सध्या मोबाईल पासून स्वतः लांब किती राहावे इत्यादी गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर जिल्हा एड्स प्रतिबंध कार्यालयाकडून समुपदेशन राखी पारेख यांनी विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये एचआयव्ही एड्स चे वाढते प्रमाण याबद्दल विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा निलेश गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ प्रमोद जाधव प्रा गोपिका वळवी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी केले कार्यक्रमासाठी बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते