Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवागांव येथील विविध समस्या सोडवा व मंजूर कामे लवकरात लवकर सुरू करा - जितेंद्र पावरा

नवागांव येथील विविध समस्या सोडवा व मंजूर कामे लवकरात लवकर सुरू करा - जितेंद्र पावरा
शिरपूर दि १३(प्रतिनिधी) ऑगस्ट रोजी नवागांव येथे झालेल्या ग्रामपंचायत ग्रामसभेत नवागांव येथील मागिल 4 वर्षापासून शासनाने मंजुरी दिलेल्या विकास कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व गावातील विविध समस्या तातडीने सोडविणे बाबत जितेंद्र पावरा यांची ग्रामसभेत जितेंद्र पावरा यांची अर्जाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनाचा आशय असा की,१३,१४,१५ वा वित्त आयोग/पेसा कायदा योजने अंतर्गत सन २०२१ – २०२४ च्या कृतीआराखडा तयार करण्यात आला त्यात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावापाड्यात सर्वे कडुन जे आवश्यक असलेल्या कामांची यादी तयार करुन सन २०२१ – २०२४ चा कृतीआराखडा ते काम घेण्यात आले होते त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत ने वेळोवेळी केला असुन अखेर शासनाने अत्यंत आवश्यक असल्याले कामांना मंजुरी देऊन सन २०२१ – २०२४ च्या १५ वा वित्त आयोग / पेसा कायदा योजने अंतर्गत निधी देखील मंजूर करण्यात आला असून जे कामे अजून पर्यंत सुरू करण्यात आले नाही किंवा काही कारणाने बंद कामे आहेत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व खालील समस्या तातडीने सोडविणे बाबत मागण्या खालील प्रमाणे
१)नवागांव येथील स्मशानभूमी शेड (मंजूर २०२१)
२)जि.प.शाळा नवागांव पाण्याची टाकी (मंजूर २०२१)
३)नवागांव येथे पाण्याचे हाळ दुरुस्त (मंजूर २०२२)
४)नवागांव येथील नविन हाळ बांधकाम पाईप लाईन करणे
५)जलजीवन योजने अंतर्गत नविन पाईप लाईन मध्ये नळ कनेक्शन जोडणे…
६)बोर-विहीर पाण्याची नविन मोटर आणणे…
७)सुचना फलक लावणे…
८)व्यायाम शाळा बांधणे…
९) समाज मंदीर नविन बांधकाम
१०) हनुमान मंदिर नवीन बांधकाम 
निवदेनात जगदिश पावरा, अजय पावरा, मंगल पावरा, शरद पावरा, महेंद्र पावरा यांचे सह्या होत्या...