Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिले राखी तयार करण्याचे व पाठवण्याचे धडे

पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिले राखी तयार करण्याचे व पाठवण्याचे धडे
 तळोदा दि १३(प्रतिनिधी)तळोदा येथील गु.दु.रा कन्या विद्यालय शाळेत पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या रक्षाबंधन निमित्त राखी तयार करण्याचा व राखी पाठवण्याच्या उपक्रम राबविला, या माध्यमातुन मा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोस्ट मास्तर जर्नल अदनाद अहमद, ज्योतीरादित्य सिंदिया, स्वप्निल कुसाले (पेरिस ओलंपिक 2024 कांस्य पदक विजेता) यांना शाळेतील मुलींनी राख्या पाठवल्या.
          तळोदा उपविभागातील मधील सुशांत पी चर्जन, डाक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनखाली कु.खुशी अग्निहोत्री शाखा डाकपाल कोठार व दानिश शेख शाखा डाकपाल खर्डी यांनी मुलींना राखी तयार करण्यासाठी व पत्र लिखाणासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गु.दु.रा कन्या विद्यालय, सांस्कृतिक समिती व क्रीडा समिती, व शिक्षकेतर बधुंनी ने योगदान दिले.या कार्यक्रमात पोस्ट ऑफिस च्या कर्मचाऱ्यांना देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार, सेवा निर्वित प्राचार्य निमेश सूर्यवंशी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक महेश मगरे यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांची मदत लाभली कार्यक्रमाचे आभार वैशाली देवरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास नरेंद्र महाले, योगेश पाटील, इंदिस ए बी, तडवी डी एल, आकाश महाजन, दिनेश मराठे, भाग्यश्री सागर, उल्हास मगरे, अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम माळी आदी सह , विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.