Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पेसा भरतीसाठी बिरसा फायटर्सची आंदोलन स्थळी उपस्थिती , रास्तारोको करत,आदिवासी विकास मंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विरोधात घोषणाबाजी

पेसा भरतीसाठी बिरसा फायटर्सची आंदोलन स्थळी उपस्थिती , रास्तारोको करत,आदिवासी विकास मंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विरोधात घोषणाबाजी 

नाशिक दि १३ (प्रतिनिधी) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)१७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा,या मागणीसाठी आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास व जन आक्रोश मोर्चास बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा,राज्यअध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, पप्पू अवाया,सोमा पावरा, कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत, सोबत चांदसूर्या ता.शिरपूर जि.धुळे येथील बिरसा फायटर्स टिम मोठ्या संख्येत सहभागी झालेत.
                 पेसा पदभरतीच्या मागणीसाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण आदिवासी समाज गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे एकवटला. या स्थळी आदिवासींच्या विषयांवर आक्रमकतेने काम करणारी बिरसा फायटर्सची टिमही सहभागी झाली.

उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत गोल्फ क्लब मैदान नाशिक येथून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आदिवासी जन आक्रोश मोर्चा नेण्यात आला.पेसाभरती झालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय,आदिवासींना न्याय द्या, सरकार हमसे डरती है,पुलीस को आगे करती है,बिरसा पुकारे ऊलगुलान ,राघोजी करे ऊलगुलान, आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,अशा जोरदार घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या.आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्ता २ तास जाम केला.
            त्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.त्यानंतर आदिवासी विकास भवन नाशिक येथे मोर्चा वळविण्यात आला. शिंदे फडणवीस सरकार, आदिवासी विकास मंत्री, विरोधात घोषणाबाजी केली.नोक-या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या अशा जोरदार घोषणा करत बिरसा फायटर्स टिम आंदोलन गाजवले.आदिवासी विकास भवन समोरील रस्त्यावर बसून रस्ता जाम केला.१ ऑगस्ट दिवसांपासून पात्रताधारक आदिवासी विद्यार्थांचे आमरण उपोषण सुरू होते.सरकारने त्याची दखल न घेतल्यामुळे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.पेसाभरती तात्काळ सुरू न केल्यास आदिवासी विकास भवन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलेला आहे.