Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माध्यमिक विद्यालय तऱ्हावद ता तळोदा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा दिवस" ध्वजारोहणाने उत्साहात साजरा

तळोदा दि १५ (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालय तऱ्हावद ता तळोदा येथे "१५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन" ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदलाल शंकर पुरी गोसावी (तऱ्हावद) होते तर ध्वजारोहन लोटनगिर सहदेवगिर गोसावी खरवड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष मंडाई एज्युकेशन सोसायटी रांझणीचे अमोल प्रल्हाद भारती होते.प्रसंगी नंदूगीर सहदेव गिर गोसावी (खरवड),दिलीप दशर ठाकरे सरपंच (तऱ्हावद),आत्माराम दयाराम पाडवी (खरवड ),बबन वेडू भारती खरवड, फनेंद्रपुरी शंकर पुरी गोसावी (तऱ्हावद),अनिल भरत पाडवी (तऱ्हावद),दिलवर पाश्या पाडवी (सरपंच पुनर्वसन ७),अशोकपुरी बाबूपुरी गोसावी (तऱ्हावद )विठ्ठल रोहीदास पाटील (तऱ्हावद),देवदास विठ्ठल पाटील (तऱ्हावद),राजाराम भीमा पाटील (तऱ्हावद) हे उपस्थित होते.
            राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व झेंडा गीत घेण्यात आले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण दिले तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप एल गोसावी यांनी केले. 

                विद्यालयातील मुख्याध्यापिका वर्षा दिलीप सांगळे उपशिक्षक,संदिप लोटनगीर गोसावी,दीपक सुभाष सोनवणे,रवींद्र पदमसिंग राजपूत,हर्षदा हंसराज सूर्यवंशी,भारती दादाजी जाधव,मयुरी अविनाश भारती,रीमा विजय पाटील,गीतांजली दिलीप जाधव 
भारती प्रेमसिंग गिरासे,शिपाई निलेश रवींद्र पाटील व विक्रम दिलीप राजपूत या सर्व कर्मचारींचा सहभागाने च्या सहभागाने देशाचा ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.