Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेठ.के.डी हायस्कूल तळोदा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

शेठ.के.डी हायस्कूल तळोदा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
तळोदा दि १(प्रतिनिधी) पी ई सोसायटी संचलित शेठ के डी हायस्कूल तळोदा येथे शाळेचे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. 
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  एस आय.जोहरी सर होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुत्रसंचालन-पी.एम.वानखेडे,श्रीमती आर.ए.मगरे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक-श्रीमती जे.आय.राणे मॅडम,सौ.एस.के.माळी मॅडम यांनी केले.विद्यार्थी भाषणात प्रथम कु.कल्याणी वानखेडे द्वितीय कु.नंदिनी नाईक,तृतीय कु.तृषांत ठाकरे तर उत्तेजनार्थ कु.नयन चौधरी,कु.आरुषी चव्हाण यांनी यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वही पेन व रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. शिक्षक भाषणात श्री.पी.पी.पाटील(पर्यवेक्षक),सौ.जे.एस.पाटील मॅडम,जे.डी.मगरे सर, आर.आर.पाडवी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणातील गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आव्हान करण्यात आले. परिक्षण-सौ.के.ए.बोरदे ,सौ.जी.आय.चौधरी मॅडम,सौ.ए.डी.पाडवी मॅडम यांनी काम पाहिले. 
आभारप्रदर्शन- पी.बी.राजपूत सर,व्ही.बी.पगार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगीनी यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक पी.पी.पाटील सर,व्ही.आर.सुर्यवंशी सर,जे.एन.माळी सर,पी.एम.वानखेडे सर,.्एन.डी.मोरे सर यांच्याकडुन बक्षिसे देण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशी सर पर्यवेक्षक पी.पी.पाटील सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.