Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्ह्यातील रोजगार हमी योजना मंजूर व ग्राम रोजगारसेवक याची कोट्यवधीची देणी थकली, उपासमारीची वेळ, मुख्यकार्यकारी अधिकारींना निवेदन

तळोदा दि १४(प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्राम रोजगारसेवक यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी रोहयो यांना कोट्यवधीची देणी थकले असल्याचे निवेदन दिले आहे.
             निवेदनाचा आशय असा, गेल्या तीन महिन्या पासून रोजगार हमी अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्याची मजुरी मिळालेली नाही, रोहयो अंतर्गत सिंचन विहीर, घरकुल, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, सीसीटी, पेवर ब्लॉक, काॅक्रीट रस्ता, अंगणवाडी बांधकाम, सार्वजनिक कामे व वैयक्तिक कामे केले आहे. गाय गोठा, कुकूट पालन,शेळी, असे अनेक कामे करून मजुरी मिळालीच नाही. शासन सांगते की, पंधरा दिवसातच मजुरांना मजुरी मिळावी आणि आज तीन महिन्याच्या वर झाले आहे तरी त्यांना मजुरी मिळाली नाही .
               मजुरीची तालुकानिहाय थकलेली रक्कम तळोदा एक कोटी सात लाख सहा हजार पाचशे अठ्यातर रुपये,शहादा तीन कोटी पाच लाख सहा हजार दोनशे चौतीस रुपये,नवापूर एक कोटी नव्यान्नव लाख एक्कावन्न हजार सव्हिस रुपये,नंदुरबार तीन कोटी शहाऐंशी लाख चौषष्ठ हजार दोनशे पंच्याहतर रुपये,
धडगाव पाच कोटी तेवीस लाख एकोनशत्तर हजार अठ्याशी रुपये,अक्कलकुवा चार कोटी नव्यान्नव लाख चौरेचाळीस हजार तीनशे बारा रुपये अशी वीस कोटी एवढी बाकी मजुरांची थकबाकी आहे,तसेच गावपातळीवर रोजगार सेवक सुद्धा शासनाचे काम करतो त्यांनाही शासनाने गेल्या मार्च महिन्या पासून मानधन दिलेले नाही पाच महिने झाले तरी काम करुन मेहनताना मिळाला नसल्याने मजुरांसह रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे.प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपासिंग चौधरी, सचिव आसाराम राऊत, सदस्य आनंद वळवी यांच्या सह्या आहेत.