Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार गोवाल पाडवी यांना निवेदन राष्ट्रीय हिवताप नियंत्रण हंगामी फवारणी कर्मचारी/ RTW यांच्याकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी व कै. चांद्या बाबा याची फोटो फ्रेम आठवणीतला ठेवा भेट

धडगाव दि ३० (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हयाचे खासदार गोवालदादा पाडवी याची भेट घेऊन राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम केलेल्या हंगामी फवारणी कर्मचारी/ RTW यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली व कै. चांद्या बाबा याची फोटो फ्रेम आठवणीतला ठेवा म्हणून सप्रेम भेट देण्यात आली.
             यावेळी धडगाव कृषी बाजार समितीचे उपसभापती ईश्वर हारसिंग पावरा, मा.सभापती धडगाव नगरपंचायत नगरसेवक कल्याणसिंग पावरा,
अक्कलकुवा धडगाव विधानसभा युवा काँग्रेस उपाध्यक्ष राकेश पावरा,काँग्रेस कमिटी सदस्य नारसी वसावे, आतमराम पाडवी, सामाजिक कार्यकर्ता संदीप पावरा, शाबीर खाटीक, सर्व युवा काँग्रेस, अक्राणी काँग्रेस कमिटीचे वतीने भेट देण्यात आली
             यासोबतच अक्राणी विधानसभा क्षेत्रातील कर्मचारी सन २००५ पुर्वीची पद भरती अनेक कारणांनी उशिरा पार पडल्यामुळे सन २००८ मध्ये शासनाने भरती प्रक्रिया राबविली तेव्हा 50% फवारणी कर्मचारी, 40% सरळ सेवा व 10% पदे हे नियमित क्षेत्रिय कर्मचारी यांच्या मधुन पदोन्नतीने असे आरोग्य सेवक हे पद भरण्यांत आले.
नोव्हेंबर २००५ पुर्वी राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम केलेल्या हंगामी फवारणी कर्मचारी/ RTW यांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी खासदार गोवाल पाडवी याना विनंती केली असता खासदार पाडवी यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील असे आश्वासन दिले व कर्मचाऱ्यांच्या भेटीचा वेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा युवा काँग्रेस उपाध्यक्ष राकेश पावरा, कृषी बाजार समिती उपसभापती ईश्वर पावरा यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.