Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निसर्गप्रेमी मयुर चव्हाण यांचे लोणार पंचायत समिती अंतर्गत टिटवी केंद्रातील शाळांत वृक्षारोपण साठी दत्तक, हजारोने वृक्षारोपण

बुलढाणा दि १६(प्रतिनिधी) जिल्ह्यातील मयूर चव्हाण नामक निसर्गप्रेमी लोणार पंचायत समिती अंतर्गत टिटवी केंद्रातील काही शाळा वृक्षारोपण साठी दत्तक घेत हजारो वृक्ष लागवड करत आहे,गेल्या सहा वर्षापासून सातत्याने चव्हाण निसर्ग संगोपन साठी झटत आहे.
      मागिलं वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेत देखील मयूर यांची महत्त्वाची भूमिका होती त्या अनुषंगाने गोत्रा येथील जिल्हा परिषद शाळेला 2 लाखाचे बक्षीस देखील मिळाले, मयूर चे असे नवं नवीन उपक्रम निश्चितच इतरांना प्रेरणा देत आहेत, या संधर्भात त्यांना विचारणा केल्यानंतर कळाले की त्यांना एक लाख वृक्ष रोपणाचा टप्पा गाठायचा आहे.
         त्यांच्या या विचार सरणीला आमचा सलाम अन् समाजात मयूर सारखे नवतरुण घडावे तसेच त्यांचे निसर्गाला योगदान मिळावे अन् मयूर कडून प्रेरणा घेत सर्वांनी एक तरी झाड निश्चितच लावावे..