Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासी आश्रमशाळेत व वस्तीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार द्या- बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी आश्रमशाळेत व वस्तीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार द्या- बिरसा फायटर्सची मागणी

नंदूरबार दि ७ (प्रतिनिधी) शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व शासकीय आदिवासी मुलां मुलींचे वस्तीगृहात कायमस्वरूपी तात्काळ सफाई कामगार व चौकीदार पदभरती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, वनसिंग पटले,जयराम पटले,जयसिंग वसावे,दिनेश वळवी,नारसिंग वसावे,भोंडा पटले,मोत्या पाडवी, हाना पटले,राज्या मोरे,आट्या तडवी,वसंत भील, पिंट्या वळवी,किसन रहासे, किसन वळवी,वसंत भील,आकाश तडवी,ननू भंडारी आदि २० ते २५ पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                        शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहात रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार काम करत आहेत. आठवड्यातून ३ दिवस म्हणजेच एका दिवसा आड सफाई कामगार आश्रमशाळेत व वस्तीगृहात सफाई काम करीत आहेत. 
       आमच्या संघटनेला काही आश्रमशाळेत व वस्तीगृहात सफाई कामगारांच्या अनियमितपणाने व रोजंदारी तत्वावर कामांमुळे अस्वच्छता निदर्शनास आली आहे. प्रत्येक आश्रमशाळेत व वस्तीगृहात कायम स्वच्छता असणे आवश्यक आहे.अस्वच्छतेचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या आरोग्यावर व अध्ययनावर होत आहे. म्हणून आश्रमशाळेत व वस्तीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी चौकीदार सुद्धा कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे.म्हणून शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व मुला मुलींच्या वसतीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार पदांची भरती करण्यात यावी.रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार पदे बंद करण्यात यावीत. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आदिवासी विकास विभाग कडे करण्यात आली आहे.