Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपचा बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत रांगोळी राज्यस्तरीय स्पर्धेत तळोदा येथील तीन जणांना पुरस्कार

नंदुरबार दि७(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत शहादा तळोदा विधानसभा तळोदा व शहादा येथे आमदार राजेश दादा पाडवी यांच्या सहकार्याने रांगोळी स्पर्धा 20-11-23 रोजी आयोजित करण्यात आली होती.
           त्या अनुषंगाने राज्यस्तरीय बक्षीस वितरण मुंबई येथे करण्यात आले. तळोदा येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. आमदार राजेशदादा पाडवीं यांनी मुंबई येथे ही सहकार्य केले.                              आदिवासी गटामध्ये काजल पाडवी द्वितीय बक्षीस मिळाले व उत्तेजनात वैष्णवी योगेश चौधरी उत्तेजनात भारती सुरेश चव्हाण अशा तिघीजणींनी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघात राज्यस्तरीय विजय मिळवला.
          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार आशिष जी शेलार व बेटी बचाव बेटी पढाव च्या प्रदेश संयोजिका शुभदा फरांदे पाद्ये सहसंयोजिका अल्फा अग्रवाल सहसंयोजिका मृणालिनी बागल नांदेड जिल्हा नंदुरबार जिल्हा संयोजिका नीला मेहता शहर संयोजिका अनिता कलाल दिव्या जोशी प्रतिभा चौधरी मान्यवर उपस्थित होते.