Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा तालुक्यातील बिबट्यांच्या उच्छाद रोखण्यासाठी उपाययोजना करा, शिवसेने तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

तळोदा दि ३ ( प्रतिनिधी) तालुक्यात बिबट्यांच्या उच्छाद वाढल्यामुळे तो रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शिवसेने तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
          निवेदनाचा आशय असा की, आम्ही तळोदा तालुक्यातील रहिवासी असून तर मागील काही दिवसात तळोद्या तालुक्यातील ग्रामीण भागात त्याचप्रमाणे तळोदा शहरातील नवीन वसाहतीच्या हद्दीपर्यंत बिबट्या चा संचार वाढला आहे. गेल्या महिन्यात चिनोदा येथील एका आठ वर्षे बालकाच्या तर काझीपुर येथे एका साठ वर्षीय महिलेच्या व तिच्या नातवाच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर वन विभागाने काझीपुर शिवारातुन तीन बिबट्या ना जेरबंद केले. मात्र त्यानंतर वन विभाग शांत बसले आहेत
       दरम्यान बिबट्या सातत्याने ग्रामीण भागासह शहरी भागात कुठेना कुठे दर्शन देत आहे तसेच बकरी, कुत्रे डुक्कर, गाय, बैल अशा प्राण्यांवर दररोज कुठे ना कुठे हल्ले झाल्याचे लक्षात येते. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती पसरली आहे. शेतामध्ये जायला सुद्धा शेतकरी धजावत नाहीत. इ पिक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन फोटो काढून अपलोड करणे आवश्यक आहे मात्र बिबट्या च्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाऊन ईपीक पाहणीचे काम देखील करत नसल्याचे पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शेतात रखवालदार सुद्धा रखवाली करायला तयार नाही मजूर सुद्धा शेतात कुठले प्रकारचे कामांसाठी जाण्यास तयार होत नसल्याचे पाहायला मिळत आहे या सर्वांच्या फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
       याबाबत वनविभागाकडे गाऱ्हाणे मांडले तर वन विभागाने हात वर केल्याचे दिसून येते. आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही प्राथमिक उपाययोजना करा असा सल्ला वनविभागाकडून देण्यात येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न आम्हा सर्वांना उपस्थित झाला आहे तरी आपण जिल्हास्तरावरून नागरिकांच्या जीवनरक्षणासाठी व शेतकयांच्या समस्या लक्षात घेऊन योग्य ती उचित कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदन देतांना शिवसेना जिल्हा उप प्रमुख आंनद सोनार, प्रवीण वळवी, संजय पटेल, सुरज माळी, जयेश सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, विजय मराठे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.