Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुज्य साने गुरुजी महाविद्यालयात वाड्ग्मय मंडळाचे उद्घाटन, मानवी मूल्यांवर आधारित साहित्य निर्माण करण्याची गरज - संतोष पावरा, युवा साहित्यिक कवी

पुज्य साने गुरुजी महाविद्यालयात वाड्ग्मय मंडळाचे उद्घाटन, मानवी मूल्यांवर आधारित साहित्य निर्माण करण्याची गरज - संतोष पावरा, युवा साहित्यिक कवी 
शहादा दि ५(प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात वाड्ग्मय मंडळाचे उद्घाटन व परिसरातील युवा साहित्यिक कवी संतोष पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. 
      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के.पटेल हे होते.उद्घाटनप्रसंगी 'साहित्यिक मूल्यांची प्रासंगिकता' या विषयावर साहित्यिक संतोष पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी साहित्याच्या वेगवेगळ्या दिशा स्पष्ट केल्या.साहित्यात बोलीभाषेचे सौंदर्य पटवून देत पावरा बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून विषय विद्यार्थ्यांसमोर मांडत वाचनाचे महत्त्वही स्पष्ट केले. पावरा म्हणाले की, "मानवी मूल्यांवर आधारित साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांचा दृष्टिकोन मानवतावादी असला पाहिजे." यावेळी संतोष पावरा यांच्या हस्ते उन्मेष भिंती पत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. 
           अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी देखील विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन वर प्रास्ताविक वाड्ग्मय मंडळाचे समन्वयक प्रा.डॉ.जी.बी.कुवर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ.आर. एस.माळी यांनी तर आभार प्रा.डाॅ.तुषार पटेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी डॉ.वजीर अशहर,प्रा.मोहसीम पठाण,प्रा.भटू कुवर, डॉ. खुमानसिंग वळवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डाॅ.एम.के.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात, संविधान फेलो सागर पावरा व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.