Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हुणाखांब ता अक्कलकुवा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात भ्रष्टाचार बाबत चौकशी,चुकिचा पद्धतीने - अशोक मोत्या वसावे

अक्कलकुवा दि ६ (प्रतिनिधी) हुणाखांब ता अक्कलकुवा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात भ्रष्टाचार बाबत चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी होत नाही, तक्रारदार अशोक मोत्या वसावे, विज्या शिवा राऊत व इरमा गिंब्या राऊत रा. हुणाखांब हे अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा करीत आहेत मात्र कुठे पाणी मुरते आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.झालेली चौकशी चुकिचा पद्धतीने झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
              निवेदनाचा आशय असा, सदर अर्जदार यांनी दि.01/09/2023 रोजी माहिती अधिकार अर्ज व प्रथम अपील दि. 18/10/2023 रोजी केली असून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची माहीती दिली नाही. तरी दि. 25/12/2023 रोजी द्वितीय अपील करण्यासाठी मा. राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक येथे गेलो होतो व परत गावी येई पर्यंत चौकशी साठी आलेले अधिकारी हे सरपंच हुणाखांब ग्रामपंचायत यांच्या राहतेघरी चहापाणी करत होते व त्यांनी जुन्या कामाची फोटो व विडियो काढली व त्यांनी कामाचे बिल हे जुने झालेल्या कामाची होती. मी विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उडवा उडवी करून उत्तरे दिली व ग्रामपंचायत नोंदवही दाखवली नाही. सदर 41 लाख 31 हजार 772 रुपयांची भ्रष्टाचार असून चौकशीसाठी आलेल्या अधिकारी हे कामाची चौकशी न करता ते सरळ सरपंचांची घरी कोंबडी खायला गेले होते. आणि मी विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उडवा उडवी करून उत्तरे दिली. झालेल्या भ्रष्टाचार कामाची नोंदवाहि प्रमाणे कोणते काम कोणत्या कालावधीत झालेले आहे त्याची रितशीर चौकशी व्हावी आणि चौकशीसाठी आलेल्या अधिकारी यांच्या उत्तराशी आम्ही सहमत नाही म्हणून जिल्हा परिषद कडून चौकशी व्हावी ही विनंती केली आहे.