Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्ह्यातील आठ जि प शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सहा संस्थांना आर्थिकरुपाने पुरस्कार, पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा संपन्न

जिल्ह्यातील आठ जि प शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सहा संस्थांना आर्थिकरुपाने पुरस्कार, पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा संपन्न

नंदुरबार दि ५(प्रतिनिधी) ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील शैक्षणिक हेळसाण थांबावी या हेतूनेच अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी हाती घेतली. शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त मिळवून देण्याला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कायम प्राधान्य दिले, असे सांगतानाच ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट घडवण्यासाठी आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित म्हणाल्या. 


आदर्श शिक्षक पुरस्कार -प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात संपन्न झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
              कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. कुमुदिनी गावीत, वित्त व शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हेमलता शितोळे, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावीत उपस्थित होते.
       नंदुरबार श्री. मनोजकुमार पोपट चौधरी जि.प. शाळा, शेजवे प्रथम,नवापूर श्रीमती सरिता जालमसिंग वळवी जि.प.शाळा, सोनारे दिगर प्रथम,शहादा श्रीमती लक्ष्मी भगवानराव रुपदे जि.प.शाळा, शिरुड दिगर प्रथम,
तळोदा श्री. पाटील दिलीप भास्कर जि.प.शाळा, पुनर्वसन क्र. 7 त-हावद प्रथम ,
अक्कलकुवा श्री. आशाबेन दिलीप पटेल जि.प.शाळा, ब्राम्हणगांव प्रथम धडगांव श्री. शिंदे रविंद्र रामदास जि.प.शाळा, तोरणमाळ प्रथम शहादा श्री. चेतन मधुकर शिंदे जि.प.शाळा, कलमाडी त.बो.विशेष उत्तेजनार्थ,धडगांव श्री. अविनाश गावीत जि.प.शाळा, कात्री विशेष उत्तेजनार्थ.
       जिल्ह्याभरातून मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा समिती मार्फत पडताळणी करुन खालीलप्रमाणे पुरस्कार वितरित करण्यात आले. ते असे : नंदुरबार जि.प.शाळा पाचोराबारी, प्रथम, रु.11 लक्ष
नवापूर जि.प.शाळा, बोरवण, द्वितीय, रु.5 लक्ष, धडगांव आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ, तृतीय, रु.3 लक्ष, 

*खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा*

 नंदुरबार: डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार, प्रथम, रु.11 लक्ष, तळोदा गो.हू. महाजन हायस्कुल, तळोदा, द्वितीय, रु.05.00 लक्ष, अक्कलकुवा एस.जे.एम. एस. हायस्कुल, कोराई, तृतीय, रु.3 लक्ष, 

तसेच आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील विद्यार्थी मिलेश सुंगाली पावरा याची जपान येथील टोकीयो येथे संपन्न झालेल्या साकोरा सायन्स लॅब येथील उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निवड झाली असल्याने व सदर विद्यार्थ्यांने तेथे जाऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याने त्याचा देखील सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागात सरळ सेवेने नव्याने रुजू झालेले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले. यावेळी सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने मनोज चौधरी, शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, भावेश सोनवणे, मयुर वाणी, भरत पाटील, आसिफ पठाण, योगेश रघुवंशी, इसरार सैय्यद, स्वप्निल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी- शिक्षण, केंद्रप्रमुख तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.