Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहिवद फार्मसी महाविद्यालयातर्फे स्व. पप्पाजी तुकारामशेठ बाविस्करांना अभिवादन

दहिवद फार्मसी महाविद्यालयातर्फे स्व. पप्पाजी तुकारामशेठ बाविस्करांना अभिवादन 

शिरपूर दि. ७ (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालय तर्फे समाज सुधारक, समाजहिती स्व. पप्पाजी तुकारामशेठ सदाशिवशेव बाविस्कर यांना चौथ्या स्मृतिदिना निमित्त भावसुमनांनी आदरांजली वाहण्यात आली.
         प्रोगेसिव रुरल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर चे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. पप्पाजी तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांच्या शिक्षण संस्थेचा वतीने त्यांचा पुण्यतिथी निमित्त होने. टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन एन्ड रिसर्च महाविद्यालय, बी.टि.बी. इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट व एस.आर.बी. इंटरनेशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पप्पाजी यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय चौधरी, जी.एल. निकम, दिलीप सालवे, नरेश बाविस्कर, कल्पना चौधरी, कांतीलाल बाविस्कर, मुकेश बाविस्कर, हेमाताई बाविस्कर, राकेश बाविस्कर व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके,‌ प्रा. चेतन भावसार, प्रा. स्वप्नील पाटील एस.आर.बी. स्कूलचे प्राचार्य सुभाष पटले, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका निवेदिता दुबे, सिद्धीका बाविस्कर, पार्थ बाविस्कर, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.