Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा
मोलगी दि ७ (प्रतिनिधी)
            अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोलगी येथील अनुदानितआश्रम शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील व प्रमुख मान्यवर विलास मराठे तर अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी होते. 
                कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेत त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व शिक्षक दिवसाचे महत्व पटवून दिले. 
        त्यानंतर प्रमुख अतिथी राहुल पाटील यांनी शिक्षकाचे अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षिका मनीषा वसावे, प्राची पाडवी व सरीता पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे वाईस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षिका मथुरा वसावे व हिराबाई वळवी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिला पाडवी यांनी तर आभार मथुरा वसावे यांनी मानले.