परंपरागतवर जल, जंगल आणि जमीन यावर अवलंबून असलेली आदिवासी अर्थव्यवस्था आता कारखानदारीवर अवलंबून आहे. परंतु, शहरीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर वाढत्या ताणामुळे, आदिवासी भाग मागे पडत आहे. जागतिक तापमान वाढ, अनियमित पाऊस, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर यांमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत आहे.
या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, शासन आणि विविध संस्थांकडून ठोस आणि समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत. नैसर्गिक शेती आणि पशुधन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण आणि कौशल्य विकासात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी निर्माण करणे यासारख्या उपाययोजना गरजेच्या आहेत. याचबरोबर, आदिवासी समुदायांच्या पारंपरिक ज्ञान आणि कौशल्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या विकासात सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक समुदाय आणि सरकारी संस्था यांच्यातील संवाद आणि सहकार्य वाढवूनच, नंदुरबार जिल्ह्याला समृद्ध आणि टिकाऊ भविष्याकडे नेता येईल.
एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प
नंदुरबार जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन, कृषी व पशुधन विकास, आरोग्य, शिक्षण आणि उद्योजकता विकास या पाच स्तंभावर उभारलेला एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अंबलबजावणीसाठी अर्थसाहाय्य कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि अंमलबजावणी अफार्म संस्थेने निर्णय घेतला. प्रकल्प अंबलबजावणीसाठी नंदुरबार तालुक्यातील १४ गावांचा प्रकल्पात समावेश करण्यात आला. २०२३ मध्ये प्रकल्पाला सुरुवात झाली आणि संबंधित गावातील लोकसहभागाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती व पशुधन व्यवस्थापन, पिण्याचे आणि सिंचनाचे स्त्रोत बळकटीकरण, शिक्षण आणि शिक्षण गरजा अभ्यासून त्यावरील उपाययोजना प्रकल्प नियोजनात अंतर्भूत करण्यात आल्या. मृदा आणि जलसंधारण, सुष्म सिंचन, शेती पिक उत्पादकता, उपजीविका विकास कार्यक्रम, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी यासारख्या घटकांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांना टिकाऊ आणि समृद्ध जीवन जगण्यास मदत करणे आहे.
जल पूजन व संगणक प्रयोगशाळा कार्यक्रमाचे वाघाळे ता. जि. नंदुरबार मध्ये समारोप दिनांक 4/9/2024 रोजी एकात्मिक ग्रामिण विकास प्रकल्प, नंदुरबार मध्ये कमिन्स CSR व अफार्म अधिकारी व कर्मचारी गावातील लाभार्थीच्या उपक्रमाना भेटी दिल्या त्यामध्ये शाळा,कृषि प्रत्येक्षिके, दुग्ध व्यवसाय, कुक्कटपालन व शेळीपालन लाभार्थीयांचा समावेश होता. तसेंच गावामध्ये अंमलबजावणी झालेल्या पाणलोट कामाना क्षेत्रीय भेटी दिल्या व वृक्षारोपनाच्या कामाची पाहणी केली. वाघाळे गावामध्ये भव्य पाणी पूजन व संगणक प्रयोग शाळेचे उदघाट्न समारंभ गिते, लोकनृत शाळेतील विद्यार्थीनी सादर केले.
कार्यक्रमात सौं. सोजन्या वेगुरू CSR हेड, श्री अमित लेले CSR, श्री सैफ नूरCSR, श्री संदीप गाडे संचालक अफार्म पुणे,प्रदीप साळवे, रोहित लोहार,मधुकर सर्गे, विजय सोनावणे, सुरेंद्र कोवे,शिवाजी पावरा, शासकीय- शिक्षण विस्तार, पंचायत समिती कृषि विस्तार अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व इतर मान्य उपस्थित होते.
सौ. सोजन्या वेगुरू यांनी गावाकऱ्यांना उत्साहाचे कौतुक करत प्रकल्पतील सक्रिय व जागृक सहभागातील सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पाणी प्रश्नावर बोलताना त्यांनी पाणी नियोजन व कृषि व्यवस्थापन यावर प्रकाश टाकला. पूर्ण करण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या कामाची खऱ्या अर्थानी फलित हे पाण्याचे व्यवस्थापन आणि हे शेतकऱ्यांनी त्याच्या पडीक क्षेत्रीय टाकलेल्या सुपीक गाळाच्या वापर आज शेती योग्य जमिनीत झाला व त्यामधून सशवंत उत्पनाची जोड आज लाभार्थी शेतकऱ्यांना देता आली. या बाबत समाधान व्यक्त केले. जर गाव कोणतेही गोष्ट एक मताने व निच्याने करते ती सार्थी लागते याचे वाघाळे गावाने एक चांगले उदहारण इतरांसमोर सादर केले व त्यांची प्रेरणा इतर गावकरी घेतील व आपल्या गावाचा विकास करतील याची आशा त्यांनी व्यक्त केली.