यांत आदिवासी महिला लग्न,सण, उत्सवात वापरतात त्या चांदीच्या दागीन्यांची मांडणी केली होती.पोषाख कसा असतो याचे जिवंत देखावे तयार केले होते.राणी काजल माता,याहा मोगी-देवमोगरा माता, अश्वत्थामा यात्रा,भातीजी महाराज यावर देखावे तयार करण्यात आले होते.सातपुड्यातील नैसर्गिक सुंदर स्थळे तोरणमाळ सिताखाई,बारामुखी धबधबा, विविध प्रकारची वाद्ये,हत्यार, अस्तंबा यात्रा,वाघदेव होळी,भोंग-या पर्यटन स्थळे,बाजार,रावलापाणी शहीद भुमी, रानमेवा आदींची पोस्टर प्रदर्शनी भरवण्यात आली होती.
आदिवासी समाजातील लग्नात शिबली डोक्यावर धरुन नाचतात ती ठेवण्यात आली होती.महिला मतदार येऊन शिबली डोक्यावर घेऊन फोटो घेत होते
मतदानाचा दिवशी तळोद्यात युवकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेच सोबत एका शंभरी पार केलेल्या वृद्ध महिलेने देखील मतदान करीत या लोकशाहीचा उत्सवात सहभाग नोंदवला. बोरद (ता. तळोदा) येथील १०६ वर्षे वृद्ध श्रीमती गंगाबाई लिमजी पाटील यांनी आज बोरद येथील २/३३८ मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला.